शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २८ एप्रिलला अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 18:39 IST

महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार

पुणे: मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या २८ एप्रिलला अनावरण करण्यात येणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव असून, ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागांतील आहेत. या मंडळींनी मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे ५४ संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन केले आहे. या फेडरेशनची स्थापना १ मे, १९६० रोजी झाली. शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात. येथे एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले असून, त्याच्या विस्तारासंदर्भातील काही मागण्या आहेत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. 

मराठी लोकांना अभिमान वाटेल असा सोहळा... 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२.५ फुटी पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण महाराष्ट्र भवन मोका मॉरिशस येथे संपन्न होत आहे. सर्व मराठी लोकांना अभिमान वाटावा असा हा सोहळा असून हा पुतळा मिळावा, यासाठी  मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असांत गोविंद व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले. पुण्याहून या फेडरेशनचे संपर्क अधिकारी नंदा पंडित व उद्योजक संतोष पंडित त्याचबरोबर महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे