शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्याच्या विरोधातील ठिय्या आंदोलन; ग्रामस्थ एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:20 IST

पाटस (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलनाका प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन शांततेत केले.

पाटस : पाटस (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलनाका प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन शांततेत केले. पाटस, वरवंड, कुसेगाव, पडवी, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, कुरकुंभ यासह अन्य काही गावांतील रहिवाशांना, तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिक वाहनांना टोलमुक्त करावे, या मागणीसाठी येथील कार्यकर्ते वसंतराव साळुंखे यांच्या पुढाकाराने ठिय्या आंदोलन झाले.या आंदोलनात तालुक्यातील बहुतांशी ग्रामस्थ सहभागी झाले होते. एकंदरीतच टोलनाका प्रशासनाच्या विरोधात सर्व ग्रामस्थ एकवटले असून, टोल प्रशासन स्थानिक रहिवाशांवर करीत असलेला अन्याय एक दिवस त्यांच्या अंगलट येईल, असा सूर आंदोलकांत होता.या वेळी वसंत साळुंके म्हणाले की, पाटसचा टोलनाका चुकीच्या ठिकाणी उभारला असून, तो बेकायदेशीर आहे. जनतेच्या हितासाठी आंदोलन करीत असून भविष्यात या आंदोलनाची व्याप्ती वाढवणार आहे यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.लक्ष्मण दिवेकर, रमेश शितोळे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात संभाजी देशमुख, रियास सय्यद, शंकर पवार, नानासाहेब फडके, अजय फडतरे यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, मंडलाधिकारी प्रकाश भोंडवे टोल प्रशासनाला ग्रामस्थांनी निवेदन दिले.दौैंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक फरगडे म्हणाले की, या टोलनाक्यावर तालुक्यातील जनतेसह इतर वाहनचालकांवर गुंडगिरी सुरू आहे.तेव्हा लोकप्रतिनिधी काय करीत आहेत, असा प्रश्न उपस्थितीत करून लोकप्रतिनिधींनी याकामी लक्ष घालावे, असे फरगडे म्हणाले.माजी सरपंच मनोज फडतरे म्हणाले की, टोलनाक्यावरगुन्हे दाखल झाल्याशिवाय टोलप्रशासन सुधारणारनाही. तेव्हा टोलनाक्याच्या विरोधात ग्रामस्थांनीएकजुट केली पाहिजे.लोकप्रतिनिधी काय करतात?दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक फरगडे म्हणाले की, टोलनाक्यावर गुन्हेगारी वाढली, सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी काय करतात, असा प्रश्न उपस्थित करुन याकामी खासदार, आमदार यांनी लक्ष द्यावे, जेणेकरुन टोलनाक्याची मुजोरी मोडीत निघेल.

टॅग्स :tollplazaटोलनाकाPuneपुणे