शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दारुबंदीसाठी शिरूर ते मंत्रालय संघर्षयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 03:38 IST

वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरच्या धर्तीवर शासनाने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने पाच जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान शिरूर ते मंत्रालय, अशी संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे.

शिरूर : वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरच्या धर्तीवर शासनाने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने पाच जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान शिरूर ते मंत्रालय, अशी संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर १० जानेवारीपासून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालया समोर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिली.गेल्या वर्षी क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) पाचंगे यांनी तालुक्यात ९१ ग्रामपंचायतीत ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव घेण्यात आले. पंचायत समितीही या मोहिमेत सहभागी झाली. जिल्ह्यातही यामुळे १३०० ग्रामस्थांनी दारूबंदी व व्यसनमुक्तीचे ठराव केले. आता संपूर्ण राज्यात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी संघर्षयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.शासनाचे दारूबंदी व व्यसनमुक्ती धोरण पाहता तसेच जागतिक दारू पिण्याचे परिणाम पाहता राज्यातील बिअरबार, परमिटरूम तसेच दारू पिण्याचे प्रमाण बेकायदा असल्याचे पाचंगे यांनी उत्पादक शुल्क आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.जगभरात दारू पिण्याचे ठरवून दिलेले प्रमाण पाहता युनायटेड किंग्डम तसेच इतर देशांत अनुक्रमे १० ते १४ युनिट दर आठवडा असे आहे. राज्यात एका व्यक्तीला दर आठवडा १५०० मि.लि. दिलेले प्रमाण चुकीचे असल्याचे पाचंगे यांनी म्हटले आहे.शासनाने नागरिकांच्या मागणीनुसार त्या भागात दारूबंदी करावी तसेच ज्या तालुक्यातून (भागातून) दारूबंदीची मागणी नसेल तिथे तेथे मिलिमीटरप्रमाणे एकाच ठिकाणी पुरवठा केंद्र सुरू करावे, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.मोक्का कायद्यांंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे. शासनाने गांभीर्याने न घेतल्यास कायदा हातात घेऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.आपल्या देशाची संपत्ती युवकांना मानले जाते. मात्र व्यसनामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे याच युवाशक्तीचा नाश होत चालला असून, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे. याला आळा बसण्यासाठी राज्यात दारूबंदी होणे आवश्यक आहे.- संजय पाचंगे,अध्यक्ष, क्रांतीवीर प्रतिष्ठान

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र