शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी हरुण आत्तार यांना राज्य माहिती आयोगाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 15:46 IST

पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हरुन आत्तार यांचा राज्य माहिती आयोगाने दणका दिला असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्याचा पूर्तता अहवाल माहिती आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पुणे खंडपीठाचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिले

ठळक मुद्देआत्तार यांना भोवले प्रथम अपिलांवर सुनावण्या न घेणे, लेखी खुलासा सादर न करणे माहिती अधिकाराच्या तरतुदींचे पालन करण्याचे देखील गांभीर्य नसल्याचे दिसले

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हरुन आत्तार यांचा राज्य माहिती आयोगाने दणका दिला असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्याचा पूर्तता अहवाल माहिती आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पुणे खंडपीठाचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिले. माहिती अधिकार कायद्यांतर्गत शिक्षण विभागात आलेल्या प्रथम अपिलांवर सुनावण्या न घेणे तसेच यासंदर्भातील माहिती आयुक्तांच्या सुनावणीमध्ये लेखी खुलासा सादर न करणे आत्तार यांना भोवले आहे. खंडपीठाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनाच थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. संतोष बबन घोरपडे यांनी आयोगाकडे १८ सप्टेंबर २०१५ रोजी द्वितीय अपिल दाखल केले होते. या अपिल प्रकरणी आयोगाने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रथम अपिलावर सुनावणी घेतली नाही. त्यामुळे माहिती अधिकार कायदा कलम १९ (६) चे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यासोबतच राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाच्या परिपत्रकांमधील तरतुदींचेही पालन त्यांनी केलेले नसल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करीत लेखी खुलासा आयोगासमक्ष सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे आदेश २५ एप्रिल २०१७ रोजी रजिस्टर्ड पोस्टाने आत्तार यांना पाठविण्यात आले होते. हे आदेश प्राप्त झाल्याची त्यांच्या कार्यालयाची पोहोचही आयोगाला प्राप्त झाली होती. मात्र, आदेश प्राप्त होऊनही त्यांनी अद्याप आयोगासमोर उपस्थित राहून अथवा टपालाद्वारे कोणताही लेखी खुलासा सादर केलेला नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आत्तार यांना शिस्तभंगविषयक कार्यवाहीबाबत खुलासा सादर करण्यात स्वारस्य नसल्याचे तसेच माहिती अधिकाराच्या तरतुदींचे पालन करण्याचे देखील गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे या कारवाई संदर्भात काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन व परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेता आत्तार यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना करण्यात आली आहे. या आदेशाची प्रत राज्याचे शिक्षण आयुक्त, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनाही पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे