शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारचा वेळकाढूपणा : पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 00:55 IST

धनगर आरक्षणाबाबत टाटा कंपनीला काम देण्याचे काय कारण होते? समिती नेमणे म्हणजे, चौकशी करणे म्हणजे वेळकाढूपणा आहे.

बारामती : धनगर आरक्षणाबाबत टाटा कंपनीला काम देण्याचे काय कारण होते? समिती नेमणे म्हणजे, चौकशी करणे म्हणजे वेळकाढूपणा आहे. ते भाजपा सरकार करीत आहे. धनगर समाजाने साथ दिल्यानेच राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करीत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.बारामती येथे अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३व्या जयंती उत्सवाचे आयोजन केले होते, त्या वेळी शहरातील शारदा प्रांगण येथे आयोजित सभेत पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले, ‘‘२०१४मध्ये प्रथम बहुमताने भाजपाचे सरकार आले. नरेंद्र मोंदीमुळे ही किमया साधली गेली. त्यांनी त्या वेळी वेगवेगळ्या समाजांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. आज त्यांच्याकडे बहुमत आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाच्या उपोषणाच्या वेळी पहिल्याच ‘कॅबिनेट’ला आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मग का आरक्षण दिले जात नाही? का पंतप्रधान निर्णय घेत नाहीत? असा सवाल पवार यांनी केला.’’या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील धनगर आरक्षणाबाबत ‘क्या हुआ तेरा वादा?’ हा एकच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारायचा असल्याचे सांगितले. अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी राज्य सरकारवर, फसव्या सरकारचे काही खरे नाही. धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारने फसवणूक केल्याची टीका केली. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, विजयराव मोरे, पौर्णिमा तावरे उपस्थित होते....मनाची तरी लाज कशी वाटत नाही?संत ज्ञानेश्वर, संत तुकाराममहाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. ९७ टक्के समाजाला क्षुद्र लेखणारा मनू सर्वश्रेष्ठ कसा होऊ शकतो? त्यांना जनांची नाही, मनाची तरी लाज कशी वाटत नाही? समाजात फूट पडेल, दुही माजेल, स्वत:ची राजकीय पोळी भाजून कशी घेता येईल? असाच प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.>...यांच्या ‘बा’नेनिर्णय घेतला होता का?मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी दुधाला ५ रुपये, दूध पावडरला ५० रुपये प्रतिकिीलो अनुदान देऊ सांगितले होते. नंतर मात्र परदेशात दूध पाठविल्यानंतर ५ रुपये देणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. घसरलेल्या दूधदरामुळे शेतकरी अडचणीत आहे. यांच्या ‘बा’ने निर्णय घेतला होता का? अशी टीका अजित पवार यांनी केली

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार