शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांकडे फक्त ‘एंटरटेनर’ म्हणून बघू नका; अन्यथा...: राहुल देशपांडेंची राज्य सरकारविरुद्ध नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 21:06 IST

राज्य सरकारने कोरोनाकाळात कलाकारांकडे लक्ष दिलं नाही : राहुल देशपांडे यांची खंत

पुणे : आम्ही फक्त ‘एंटरटेनर’ नाही. संगीत किंवा नाटक असो ते सामाजिक शांततेच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाते. त्याच्याकडे तुम्ही निव्वळ मनोरंजन म्हणून बघितले तर गल्लत होईल. त्याच्याकडे केवळ मनोरंजन म्हणून न बघता समाजाची गरज म्हणून पाहिले तर कलाकार जगतील. ते जगले नाही तर समाजव्यवस्था टिकणार नाही. कोरोनाकाळात राज्य सरकारनेकलाकारांकडे लक्ष दिलेलं नाही, अशा शब्दात गायक राहुल देशपांडे यांनी राज्य सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने थोडं संवेदनशील होत आमच्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचं आहे, अशी विनंतीही केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांसह लग्न समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विविध पक्षांचे राजकीय कार्यक्रम सुरू असून, त्या कार्यक्रमांना गर्दी होत असतानाही सरकार आणि प्रशासन मौन बाळगते. इतक सगळं सुरू आहे,  पण नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमानंतर राहुल देशपांडे आणि आनंद इंगळे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

सरकारने कलाकारांकडे लक्ष दिलेले नाही अशा शब्दात राहुल देशपांडे यांनी सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त केली,  केवळ पडयामागचे कलाकार नाहीत तर स़्टुडिओमध्ये काम करणारे आणि ऑर्केस्ट्रामध्ये गाणारे वाजवणारे कलाकार असतील.  त्यांना सरकारने पैसेच द्यायला हवेत असे नाही तर किमान त्यांचा इन्शुरन्स काढावा, रूग्णालयांच्या बिलांचे पैसे असोत ते द्यावेत असे काहीतरी करायला हवे तर कलाकारांचा विश्वास बसेल. आत्ता सरकार खूप काम करतंय, लसीकरण सुरू केलंय..पण राजकीय गर्दी चालते तिथे काणाडोळा होतो मग आम्ही गायचे का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सगळी खबरदारी घेऊन प्रेक्षक येतोय तर मग नाट्यगृह का सुरू होत नाहीत. चांगली कला, संगीत जगले तर समाज जिवंत राहातो. सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की आमच्याकडे थोडे लक्ष द्या.

आनंद इंगळे यांनी देखील नाट्यगृह सुरू व्हायला पाहिजेत असे सांगितले.  मनोरंजन ही समाजाची मोठी गरज असते. नाट्यगृह सुरू झाल्यानंतर प्रेक्षक येतील की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण आपण प्रयत्नही करायचा नाही ही गोष्ट योग्य नाही. लोकांची गेट टूगेदर चालू आहेत, इतरही कार्यक्रम चालू आहेत. हे सर्व सुरू आहे मग कला क्षेत्र का नाही? सर्व नियमांचे पालन करून आम्ही नाटक करू यासाठी नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी द्या अशी आमची प्रशासनाकडे मागणी असल्याचे ते म्हणाले.----------------------- 

टॅग्स :PuneपुणेartकलाRahul Deshpandeराहुल देशपांडेmusicसंगीतState Governmentराज्य सरकार