शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निलंबनाचा ठराव करून लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम आघाडी‌ सरकारने केलं! देवेंद्र फडणवीसांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 18:34 IST

आम्ही जनतेत जाऊ आणि गरज पडली तर न्यायालयात‌ देखील दाद मागण्यासाठी जाणार

पुणे : ओबीसींच्या मुद्द्यांवरून आम्ही राज्य सरकारचा भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र, यावरूनच सत्ताधारी पक्षाची मानसिकता उघड झाली आहे. १२ आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीला फासावर लटकवण्याचे‌ काम महाविकास आघाडी‌ सरकारने केले आहे अशी खरमरीत टीका  विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, मी २२ वर्षांपासून सभागृहात आहे. आणि त्याचे पूर्ण भान ठेवून आणि विश्वासाने सांगतो की, भाजपच्या एकही नेत्याने सभागृहात हाणामारी किंवा शिवीगाळ केलेली नाही. हा यावेळी वाद झाले. मात्र कोणीही नेत्याने पीठासीन अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केलेली नाही. हे सर्व सत्ताधारी पक्षाचे कपोलकल्पित कुभांड आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. मात्र, कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी विद्यार्थी प्रश्नांवर आवाज उठवत राहणार आहोत. 

... तर न्यायालयात‌ दाद मागण्यासाठी जाणार

आताच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन झाले. कट रचून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ओबीसींच्या मुद्द्यावर सगळी माहिती जाहीर केल्यावर अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच आमचे आमदार निलंबित केले. यावरुनच सत्ताधारी पक्षांची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. मुळात, सरकारला ओबीसी आरक्षणात काहीच रस नाही. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन चतुर्थांश निवडणुका होणार आहेत. तिथपर्यंत जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतर मिळूनही पुढील सात वर्षे काही फायद्याचे ठरणार नाही. यामुळेच, सरकार फक्त चालढकलपणा करत आहे. त्यांना फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्ट टाईमपास करायचा आहे. पण, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले. चुकीच्या पद्धतीने आमचे बारा आमदार निलंबित केले. त्याविरोधात आम्ही जनतेत जाऊ आणि गरज पडली तर न्यायालयात‌ देखील दाद मागण्यासाठी जाणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंडे भगिनींच्या नाराजीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले...प्रितम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांची नाराजी आणि भागवत कराड यांना मिळालेले मंत्रिपद याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आणि डॉ. भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांनी तयार केलेलं नेतृत्व आहे. याला पद दिल्याने, याला मंत्री केल्याने याला संपवायचंय वगैरे भाजपामध्ये नसतं. भागवत कराड यांना मंत्री केल्याने जेवढा आनंद मला किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना झाला आहे. त्याच्यापेक्षा जास्त आनंद पंकजाताईंना झाला असेल. कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार