शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारची पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 21:00 IST

डॉ. नायडू रुग्णालयाच्या दहा एकर जागेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार

ठळक मुद्देट्रस्टची होणार स्थापना 

पुणे : महापालिकेच्यावतीने डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारातील दहा एकर जागेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीयमहाविद्यालय उभारण्यात येणार आहे. हे महाविद्यालय ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्याकरिता पालिकेने राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा पार पडला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास पालिकेला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यालक स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर गेल्या वर्षी २८ ऑगस्ट रोजी मुख्य सभेने मान्यता दिली होती. आरोग्य विभागाने याकरिता सल्लागाराची नेमणूक केली होती. सल्लागाराने पालिकेला फिजिबिलिटी रिपोर्ट सादर केला होता. त्यानुसार, हे महाविद्यालय उभारण्यासाठी दोन मॉडेल समोर ठेवण्यात आले होते. महापालिकेने स्वत: हे रुग्णालय चालविणे किंवा ट्रस्टच्या माध्यमातून चालविणे असे दोन पर्याय होते. यातील ट्रस्टचा पर्याय योग्य वाटल्याने त्याला मंजुरी देण्यात आली होती. पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी अहमदाबाद येथे जाऊन तेथील मॉडेलची पाहणी केली होती. त्यानंतर, ट्रस्ट स्थापन करण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली होती. नगरविकास खात्याचे मुख्य सचिव महेश पाठक हे पुण्यात असताना महापालिका प्रशासनाने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी याविषयी सर्व माहिती घेतल्यानंतर या प्रस्तावाला मान्यता देत ट्रस्ट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. --------आरोग्य विभागाने महाविद्यालया संदभार्तील तांत्रिक बाबींची पूर्तता करत शासनाकडे पाठपुरावा केला. उर्वरित तांत्रिक मान्यता घेऊन पुढील वर्षीच्या जूनमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ५०० खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या विधी विभागामार्फत ट्रस्ट नोंदणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. रुग्णालयाच्या उभारणीसाठी नेमलेल्या सल्लागाराला पुढील कार्यवाही व मान्यतेसंदर्भात सूचना देण्यात येतील असे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी सांगितले. ------ -------१. महाविद्यालयासाठी विविध प्रवर्गातील ५९५ पदांची निर्मिती करुन भरती प्रक्रिया पार पडण्यात येणार. २. येत्या सहा वर्षात यासाठी टप्प्याटप्प्याने ६२२ कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे. ३. रुग्णालय उभारण्यासाठी महापौर मुरलीधर मोहळ यांनी प्रस्ताव देऊन पाठपुरावा केला.  

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका