शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू होणार कौशल्य प्रशिक्षणाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:57 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अ‍ॅटोमोटिव्ह आॅटोमोशन, आयटी/आयटीएस, रिटेल मॅनेजमेंट आणि रिन्यूएबल एनर्जी या विषयांच्या एम. वोक. (मास्टर इन वोकेशन) पदव्युत्तर अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहेत.   

ठळक मुद्देविद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्या संचालक डॉ. पूजा मोरे यांनी दिली माहितीखासगी संस्थांच्या तुलनेत अतिशय माफक शुल्कात उपलब्ध करून दिला जाणार अभ्यासक्रम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अ‍ॅटोमोटिव्ह आॅटोमोशन, आयटी/आयटीएस, रिटेल मॅनेजमेंट आणि रिन्यूएबल एनर्जी या विषयांच्या एम. वोक. (मास्टर इन वोकेशन) पदव्युत्तर अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहेत.   दीनदयाल उपाध्याय (डीडीयू) कौशल्य केंद्र म्हणून दर्जा मिळालेल्या संस्थांनाच एम. वोक. हा अभ्यासक्रम सुरू करता येतो. भारतात ६४ केंद्रांना हा दर्जा दिला आहे. त्याअंतर्गत निधीही उपलब्ध होतो. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला हा दर्जा मिळाला आहे. म्हणूनच हा अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. विद्यापीठात ‘बॅचलर आॅफ वोकेशन’ हा अभ्यासक्रम २०१४-१५ पासून सुरू झाला आहे. त्यात अ‍ॅटोमोटिव्ह आॅटोमोशन, आयटी / आयटीएस, रिटेल मॅनेजमेंट आणि रिन्यूएबल एनर्जी या विषयांच्या पदव्या मिळतात. त्याचबरोबर आता त्याचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्या संचालक डॉ. पूजा मोरे यांनी दिली.हा पॅटर्न नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्कनुसार (एनएसक्युएफ) लागू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात ही लवचिकता असल्याने विद्यार्थी एखादे वर्ष शिक्षण घेतल्यानंतर अनुभव घेऊ शकतात आणि पुन्हा अधिक अभ्यास करण्यासाठी पुढच्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतात, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. नव्याने सुरू करण्यात येत असलेला ज्वेलरी डिझायनिंग अँड जेमॉलॉजी हा पुणे व परिसरातील कौशल्याची आवश्यकता पाहून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी हा अभ्यासक्रम शिकवला जात असला, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळणारएम. वोक. हा अभ्यासक्रम खासगी संस्थांच्या तुलनेत अतिशय माफक शुल्कात उपलब्ध करून दिला जाणार आहे. वोकेशन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कामाचा जास्तीत अनुभव मिळावा, याची काळजी घेतली जाते. बॅचलर अभ्यासक्रमातील तीन वर्षे वेगवेगळी मोजली जातात. एक वर्ष अभ्यासक्रम केला, तरी काही ना काही प्रमाणपत्र मिळते. अभ्यासक्रमाचे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर, डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळते. दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर अ‍ॅडव्हान्स डिप्लोमाचे पत्र मिळते आणि तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र मिळते. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे