शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती बैठक : महत्त्वाचे विषय पडले बाजूलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 02:58 IST

स्थायी समिती बैठक : आयुक्त राहिले अनुपस्थित

पुणे: कचऱ्याचे बायोमायनिंग व अन्य काही विषयांवर चर्चा न करता ते पुढच्या सभेत घेण्याचा निर्णय घेत स्थायी समितीची सभा बुधवारी संपवण्यात आली. आयुक्त व अतिरिक्त आयुक्त अनुपस्थित असल्यामुळे सभेत महत्त्वाचे विषय घेता आले नाहीत. समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज सुरू झाले. आयुक्त सौरव राव कार्यालयीन कामकाजासाठी मुंबईला गेले होते, तर अतिरिक्त आयुक्त शीतल ऊगले-तेली रजेवर होत्या. दुसरे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर व अन्य विभागप्रमुख सभेला उपस्थित होते. मात्र, आयुक्त नसल्यामुळे बायोमायनिंग, स्मार्ट सिटी कंपनीची हद्दवाढसारख्या विषयावर चर्चाच झाली नाही.

फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये साठलेल्या कचºयावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्याचा हा विषय असून, त्यातून २० एकर जागा मोकळी होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यासाठीच्या मंजुरीचा विषय सभेसमोर होता. हा विषय लांबणीवर टाकण्यात आला. रस्त्यावरच्या बेघर मुलांसाठी निवारा तयार करण्याच्या योजनेत बेघर मुले शोधण्यासाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती व अन्य काही अधिकार समाजविकास विभागाने स्वत:कडे घेतले असून, त्याबाबत फेरविचार करावा, असा प्रस्ताव भैय्यासाहेब जाधव यांनी दिला होता. तो दप्तरी दाखल करण्यात आला.

मुळीक म्हणाले, ‘फक्त वर्गीकरणाचे विषय मंजूर करण्यात आले. आयुक्त नसल्यामुळे अनेक महत्त्वाच्या विषयांची माहिती सदस्यांना मिळाली नाही. त्यामुळे ते विषय पुढील सभेत घेण्याचा निर्णय झाला. स्मार्ट सिटी कंपनीचे विशेष क्षेत्र असलेल्या औंध-बाणेर-बालेवाडीच्या हद्दीत वाढ करण्याचा प्रस्तावही सभेसमोर होता. हा विषयही पुढे घेण्यात आला.’च्कालवा फुटीच्या घटनेवर सभेत चर्चा झाली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे नियोजन कमी पडल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. उपनगरांना पाणी मिळणार नव्हते तर त्यासाठी या विभागाने त्वरीत पाण्याच्या टँकरची व्यवस्था करणे गरजेचे होते, मात्र तसे झालेले दिसले नाही. अन्य काही विषयांवरही सभेमध्ये चर्चा झाली असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका