शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

...तर मागेल त्या ठिकाणाहून मिळणार एसटी; प्रवाशांना दिवाळीसाठी सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 14:20 IST

दिवाळीच्या काळात संपूर्ण गाडी आरक्षित केल्यास मागेल त्या ठिकाणाहून बस सोडण्याची तयारी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) दर्र्शविली आहे

ठळक मुद्देयंदा उत्सवासाठी २ हजार ८०० जादा बसचे नियोजनयंदा दहा ते पंधरा टक्के प्रवाशांची वाढ लक्षात घेऊन जादा बस सोडण्यात येणार आहे.एसटीचे शहरात २४ अधिकृत विक्री केंद्र आहे.

पुणे : दिवाळीच्या काळात संपूर्ण गाडी आरक्षित केल्यास मागेल त्या ठिकाणाहून बस सोडण्याची तयारी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) दर्र्शविली आहे. एसटीच्या अधिकृत एजंटांमार्फत देखील बस आरक्षित झाल्यास ही सुविधा देण्यात येणार आहे. यंदा उत्सवासाठी २ हजार ८०० जादा बसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या वर्षी १२ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या दिवाळीच्या काळात तब्बल २ लाख ९५ हजार प्रवाशांनी एसटीसेवेचा वापर केला होता. त्यावेळी अडीच हजार बसचे नियोजन करण्यात आले होते. यंदा दहा ते पंधरा टक्के प्रवाशांची वाढ लक्षात घेऊन जादा बस सोडण्यात येणार आहे. सणाच्या काळात सुरुवातीच्या बसस्थानकावरुनच बस भरुन निघते. त्यामुळे उपनगरातील प्रवाशांना भरलेली बसच पाहावी लागते. त्यांच्यासाठी यंदा विशेष बस सोडण्यात येतील. म्हणजे स्वारगेटहून सुटणारी बस हडपसरपर्यंत मोकळी जाईल. तेथूनच प्रवासी घेतले जातील. त्यामुळे उपनगरातील प्रवाशांना शहरातील बसस्थानक गाठावे लागणार नाही. येत्या सात दिवसांत त्याचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. आरक्षणासाठी ५८४ बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एसटीचे शहरात २४ अधिकृत विक्री केंद्र आहे. या ठिकाणाहून देखील नागरिकांना तिकीट आरक्षित करण्यात येणार आहे. एखाद्या एजंटकडून विशिष्ट मार्गावरील संपूर्ण बस आरक्षित झाल्यास, त्याच भागातून ती सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी मैदानातून ४८४ बसचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेटमधून ९४२, शिवाजीनगर ९४८, पिंपरी-चिंचवड २८४ अशा २ हजार ६५८ बस सोडण्यात येतील. तसेच, गरजेनुसार त्यातही वाढ करण्यात येणार आहे. जादा बसचे असे असेल नियोजन शिवाजीनगर : १४ ते १८ आॅक्टोबर दरम्यान नाशिक, औरंगाबाद जिल्हाशासकीय इंजिनिअरींग महाविद्यालय , शिवाजीनगर (१४ ते १८ आॅक्टोबर) : नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, सिल्लोड, चोपडा, धुळे, हिंगोली, जाफराबाद, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, मेहकर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगाव, तुळजापूर, उदगीर, उमरगा, वाशीम, यावल, सवतमाळ, बुलढाणा.

टॅग्स :Puneपुणे