शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंधन भडक्यामुळे एसटीचे तिकिटदर वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:14 IST

एसटीला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देविचार सुरु : डिझेल भाववाढीने ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा

पुणे : दररोज काही पैशांनी होणाऱ्या डिझेलच्या भाववाढीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळासमोर (एसटी) आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे तिकिट दरवाढीचा गांभीर्याने विचार सुरु केला असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. गेले काही महिने सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होत आहे. कर्नाटक निवडणुकी दरम्यानचा पंधरवडा सोडल्यास इंधनदरवाढ सुरुच आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर गेल्या आठ दिवसांत डिझेलच्या दरात लिटर मागे २ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. २२) डिझेलचा प्रतिलिटर भाव ७१.२३ रुपये इतका होता. मे २०१७ मध्ये एसटीला मिळणाऱ्या डिझेलचा दर सरासरी ५८.०२ इतका होता. तो यंदाच्या मे महिन्यात सरासरी ६९.३९ रुपये प्रतिलिटर झाला झाला आहे. त्यामुळे प्रति लिटर १०.३८ रुपये इतके जादा पैसे एसटीला मोजावे लागत आहेत. वाढत्या डिझेल किंमतीमुळे दिवसेंदिवस इंधन खर्चात वाढ होत असून तब्बल २ हजार ३०० कोटी रुपयांचा संचित तोटा सोसणाऱ्या एसटीला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. याचबरोबर तितकाच आर्थिक भार एसटीतील सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीमुळे भविष्यात सहन करावा लागणार आहे. या शिवाय महामार्गावरील टोलदरवाढीचा अतिरिक्त भारही एसटीवर पडत आहे. गेली सहा महिने सातत्याने डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असून देखील केवळ ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तिकिट दरवाढीची झळ बसू नये म्हणून एसटीने आतापर्यंत तिकिट दरवाढ करण्याचे टाळले आहे. यापूर्वी जुलै -आॅगस्ट २०१४ मध्ये एसटीची तिकिट भाडेवाढ झाली होती. आता मात्र सातत्याने होणाऱ्या डिझेल भाववाढीमुळे नाईलाजास्तव तिकिट भाडेवाढ करणे भाग पडत आहे. वरील सर्व घटकांचा विचार करुन एसटी प्रशासन लवकरच आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार तिकीट भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. 

टॅग्स :Puneपुणेstate transportराज्य परीवहन महामंडळPetrolपेट्रोलDieselडिझेल