शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची भाडेवाढ अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:16 IST

डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडू लागलेल्या एसटी महामंडळावर आता वेतनवाढीचा बोजा पडणार असल्याने तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही.

ठळक मुद्देर एसटीवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही. भाडेवाढ झाल्यास लांबपल्याच्या बसेसचे तिकीट दर जास्त

पुणे : डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडू लागलेल्या एसटी महामंडळावर आता वेतनवाढीचा बोजा पडणार असल्याने तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. एसटी प्रशासनाने सुमारे ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिल्याने एसटी भाड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या बसचे भाडे जास्त वाढू शकते, असेही अधिकाऱ्यांनी नमुद केले.एसटीच्या ताफ्यात सर्वच बस डिझेलवर धावतात. त्यामुळे दररोज काही हजार लिटर डिझेल लागते. त्यातच मागील काही दिवसांपासून डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. महिनाभरात डिझेलच्या दरात सुमारे साडे तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एसटीवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यातच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा १ लाख ५ हजार ६७९ कर्मचाऱ्यांना होणार आहे. ही वेतनवाढ ४ हजार ८४९ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे पुढील काळात एसटीला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागण्याची शक्यता आहे. आधीच एसटी तोट्यात चालली आहे. यापार्श्वभुमीवर एसटीवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच एसटी प्रशासनाने रावते यांच्यासमोर सुमारे ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्याची एसटीची गरज लक्षात घेऊन रावते यांच्याकडूनही भाडेवाढीला हिरवा कंदील मिळू शकतो. ही भाडेवाढ पुर्णपणे मान्य न करता त्यात २ ते ५ टक्क्यांपर्यंत कपात केली जाण्याची शक्यता आहे. भाडेवाढ झाल्यास एसटीवरील आर्थिक बोजा कमी होऊन वेतनवाढ देणे शक्य होईल. भाडेवाढ नाकारल्यास राज्य शासनाच्या खांद्यावर हा खर्च पडणार आहे. सद्यस्थितीत शासनानेच विविध खर्चात कपात करण्याचे धोरण स्वीकारल्याने एसटीचा अतिरिक्त भार घेणार नाही. त्यामुळे भाडेवाढीशिवाय एसटीला पर्याय नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

-----------भाडेवाढ झाल्यास लांबपल्याच्या बसेसचे तिकीट दर जास्त होतील. शिवशाही, शिवनेरी या सर्वाधिक पसंतीच्या गाड्यांचे तिकीट दर जास्त वाढतील. सध्या खासगी ट्रव्हल्स कंपन्यांना एसटीच्या तिकीट दराच्या दीड पटीपेक्षा जास्त भाडे घेता येत नाही. त्यामुळे एसटीची भाडेवाढ झाल्यानंतर त्याचा फायदा ट्रॅव्हल कंपन्यांनाही होणार आहे. त्यामुळे त्यांचेही लक्ष या भाडेवाढीकडे लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेDieselडिझेलDieselडिझेल