शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या जागी खासगी बसेस, प्रवाशांचे हाल मात्र संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:15 IST

प्रवाशांची ही गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने खासगी वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. मात्र या वाहतूकदारांकडून प्रवाशांची पिळवणूक होत आहे.

ठळक मुद्देतिकीट दर तर वाढवलाच आहे, मात्र साहित्याचेही वेगळे दर आकारले जात असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढएसटी फलाटावर एसटीच्या जागी खासगी वाहने दिसत होती. त्यामुळे एजंटांचाही सुळसुळाट

महर्षीनगर : राज्य परिवहन मंडळाने ऐन दिवाळीत केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवशांचे हाल व गैरसोय होत आहे. प्रवाशांची ही गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने खासगी वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. मात्र या वाहतूकदारांकडून प्रवाशांची अक्षरश: लूट अन् पिळवणूक होत आहे. तिकीट दर तर वाढवलाच आहे, मात्र साहित्याचेही वेगळे दर आकारले जात असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पंढरपूरसाठी ५०० रुपये द्यावे लागत असून काही ठिकाणी  ४०० रू दर देऊन एजंट लोकांना १००रू द्यावे लागत होते. बारामती साठी ३५०रू. दर द्यावा लागत होता. बुधवारी सकाळी हा दर १००० रुपये पर्यंत द्यावा लागत होता. परंतु पोलिसांनी व राज्य परिवहन मंडळाच्या आधिकार्‍यांनी मध्यस्थी करून एसटीच्या दराप्रमाणे दर आकारुन वाहतूक करण्यास सांगितले. शहरातून बाहेर जाणार्‍यांची संख्या जास्त जरी असली तरी परतीचा प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे हा दर खासगी वाहतूकदारांकडून आकारण्यात येतो, असे खासगी वाहतूक व्यावसायीक तानाजी वाशिवले यांनी सांगितले.संपाच्या धर्तीवर मिळालेल्या परवानगीमुळे एसटी फलाटावर एसटीच्या जागी खासगी वाहने दिसत होती. त्यामुळे एजंट लोकांचा सुळसुळाटही दिसत होता. या संपामुळे सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत असून शासनाला संपाची कल्पना दोन महिने आधी देऊनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राज्य सरकार व परिवहन मंडळाच्या भांडणामध्ये आम्हाला वेठीस धरले जात आहे, अशी भावना सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली.

टॅग्स :ST Strikeएसटी संपPuneपुणे