पुरंदर तालुक्यातील नीरा एस.टी. बसस्थानकात जव्हार- पंढरपूर एस.टी. थांबते. तेवढ्यात १०८ अँम्ब्युलन्सही दाखल होते. अन् बसमधील फिट आलेल्या प्रवाशाला १०८ अँम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी तातडीने अँम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केले, प्रवाशी रूग्णांसह १०८ अँम्ब्युलन्स सुसाट वेगाने सायरन वाजवत सोमेश्वर येथील खाजगी हाँस्पिटलला दाखल होते .अन् प्रवाशी रूग्णांबरोबर असलेल्या पत्नीचा जीव भांड्यात पडला.
ही घटना आहे शनिवार २३ जानेवारीच्या रात्री आठ वाजता.
शनिवारी (दि.२३) जव्हार - पंढरपूर ह्या बसमध्ये हडपसरमधून फलटणला जाण्यासाठी एक ५० ते ५५ वर्षाचे गृहस्थ व त्यांची पत्नी बसले. नीरा गावाजवळ बस येत असताना त्या प्रवाशी गृहस्थांना अचानक फिट आली. त्यामुळे त्यांच्या पत्नी सह प्रवाशांंमध्ये भीतीचे वातावरण झाले. तेवढ्यात त्याच बसमधील एका प्रवाशाने समय सुचकता दाखवत बस पुढे कोणत्या बसस्थानकात थांबणार आहे याचा अंदाज घेतला. अन् तातडीने 'डायल१०८' या नंबरवर मोबाईल फोनने संपर्क साधला. त्या '१०८' अँम्ब्युलन्सला नीरा बसस्थानकात पाचारण केले.
दरम्यानच्या वेळात जव्हार - पंढरपूर ही बस नीरा (ता.पुरंदर) येथील बसस्थानकात प्रवेश करतेना करते तोच दुसऱ्या प्रवेशद्वारातून '१०८ अँम्ब्युलन्सही दाखल झाली. अँम्ब्युलन्समधील डॉक्टर उतरले आणि त्यांनी बसमधील प्रवाशी गृहस्थाची तपासणी केली. तेवढ्यात बसचे चालक, वाहकांनी याची माहिती नीरा बसस्थानककाचे वाहतुक नियंत्रक उत्तम गायकवड यांना दिली. त्यांनीही प्रवाशी रूग्णाला तातडीने अत्यावश्यक उपचार मिळण्याकरिता सहकार्य केले. तेवढ्यात नीरा बसस्थानकात बस आणि अँम्ब्युलन्स एकाचवेळी दाखल झाल्याने पाहणाऱ्यांंची गर्दी झाली. काय झाले, कोणालाच कळले नाही.
बसमधील समय सुचकता दाखविलेल्या प्रवाशाने डॉक्टरांना प्रवाशी रूग्णाची माहिती देऊन सदरच्या प्रवाशाला तातडीने उपचार मिळण्याकरिता विनंती केली. प्रवाशी रूग्णाला अँम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करण्यात आले. डॉक्टरांंनी नजिक असलेल्या सोमेश्वर येथील खाजगी हाँस्पिटलला अँम्ब्युलन्स नेण्याची सुचना ड्रायव्हरला दिली. प्रवाशी रूग्णांसह अँम्ब्युलन्सने सुसाट वेगाणे सायरन वाजवत व तातडीने सोमेश्वर येथील खाजगी हाँस्पिटल गाठले. डॉक्टरांनी प्रवाशी रूग्णाला पुढील उपचाराकरिता खाजगी हाँस्पिटलमध्ये दाखल केले. संबंधित प्रवाशी रूग्णाला तातडीने अत्यावश्यक उपचार मिळण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर त्यांच्यावर खाजगी हाँस्पिटलच्या डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर संबंधित प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे.
वास्तविक, प्रवाशी रूग्णाचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्याला प्रवासामधील समय सुचकता दाखविणारा प्रवाशाचे सहकार्य लाभले. '१०८ अँम्ब्युलन्सनेही अत्यावश्यक सेवा चोख बजावली. त्यामुळे प्रवाशी रूग्णांच्या पत्नीचा जीव भांड्यात पडला.
-----------------------------------------------------------------