शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

एसटी बसच्या काचांना जाळ्यांचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 21:19 IST

मराठा आंदोलनादरम्यान २० ते २९ जुलै या दहा दिवसांत एसटी महामंडळाच्या ३५३ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुर येथे सर्वाधिक बस फोडण्यात आल्या.

ठळक मुद्देराज्यात अनेकदा ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये एसटी बसेस लक्ष्य सध्या बारामती, इंदापुर आगारांतील गाड्यांसाठी जाळ्याशिवशाही, शिवनेरी या गाड्यांना अशा जाळ्या बसविणे शक्य होणार नाही.

पुणे : राज्यभरात विविध ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात पहिले लक्ष्य ठरणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसला आता लोखंडी जाळ्यांचे कवच मिळणार आहे. महामंडळाकडून यापुवीर्ही काही गाड्यांना समोरच्या बाजुला जाळ्या बसविल्या आहेत. मात्र, मराठा आंदोलनात बसेसच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बहुतेक साध्या गाड्यांना अशा बसविण्यात येणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.मराठा आंदोलनादरम्यान २० ते २९ जुलै या दहा दिवसांत एसटी महामंडळाच्या ३५३ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुर येथे सर्वाधिक बस फोडण्यात आल्या. यामध्ये एसटी बसेसचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चाकण येथे झालेल्या आंदोलनात दोन साध्या गाड्यांसह शिवशाहीच्याही काचा फोडण्यात आल्या. याआधीच राज्यात अनेकदा ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये एसटी बसेसला लक्ष्य करण्यात आले आहे. काचांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आंदोलनांमध्ये एसटीच्या पुढील भागाच्या काचा फोडल्या जातात. या काचांची किंमत पाच ते दहा हजारांच्या घरात आहे. त्यामुळे याचा एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अनेकवेळा चालत्या बसवर समोरच्या बाजुला दगडफेक केली जाते. त्यामुळे काच फुटून चालकाचे बसवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे. अशा घटना प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे एसटी महामंडळाकडून याबाबत आधीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून साध्या गाड्यांना समोरच्या बाजुकडील काचांना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, हे प्रमाण अत्यल्प आहे.मराठा आंदोलनामध्ये झालेल्या नुकसानीनंतर महामंडळाने आता जास्तीत जास्त गाड्यांना पुढील भागातील काचांवर लोखंडी जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व विभागांना याबाबत सुचना देण्यात आल्या आहे. या जाळ्या उपलब्ध होतील, त्यानुसार बसविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने संवेदनशील आगारांना सुरूवातीला प्राधान्य दिले जाणार आहे. ह्यपुणे विभागामध्ये आधीपासूनच काही गाड्यांना जाळ्या आहेत. पण आता त्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. सध्या बारामती, इंदापुर आगारांतील गाड्यांसाठी जाळ्या देण्यात आल्या आहेत. आणखी जाळ्या मागविण्यात आल्या आहेत. या जाळ्या केवळ साध्या गाड्यांना बसविल्या जातील. शिवशाही, शिवनेरी या गाड्यांना अशा जाळ्या बसविणे शक्य होणार नाही. तसेच प्रामुख्याने आंदोलनाच्या ठिकाणी या गाड्या सोडल्या जात नाहीत, अशी माहिती एसटीच्या पुणे विभागाच्या नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. -----------

टॅग्स :PuneपुणेStrikeसंप