शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

क्रीडा साहित्याबाबत पालिकेचा ‘खेळ’

By admin | Updated: December 21, 2015 00:36 IST

महापालिकेने अ‍ॅथलेटिक्सचे सिंथेटिक ट्रॅक बांधून ४ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सरावासाठी लागणारे साहित्य प्रत्यक्ष मैदानात येण्यास नुकताच मुहूर्त लागला आहे

पिंपरी : महापालिकेने अ‍ॅथलेटिक्सचे सिंथेटिक ट्रॅक बांधून ४ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सरावासाठी लागणारे साहित्य प्रत्यक्ष मैदानात येण्यास नुकताच मुहूर्त लागला आहे. मात्र, हे साहित्य अपूर्ण असल्याचे धक्कादायक चित्र आहे. अ‍ॅथलेटिक्स खेळ व तांत्रिक माहितीचा अभाव असल्याने महापालिकेच्या क्रीडा विभागाचा फोलपणा आणि निष्क्रियता यातून उघड झाली आहे. महापालिकेतर्फे इंद्रायणीनगर, भोसरी येथे अ‍ॅथलेटिक्स खेळासाठी संत ज्ञानेश्वरमहाराज क्रीडा संकुलात ४०० मीटर अंतराचा सिंथेटिक ट्रॅक ४ वर्षांपूर्वी विकसित करण्यात आला. धावणे, फेकी व उडी या क्रीडा प्रकारांचा अ‍ॅथलेटिक्समध्ये समावेश आहे. मात्र, त्यासाठी लागणारे साहित्यच नसल्याने येथे स्पर्धाच होत नव्हत्या. या सिंथेटिक मैदानात क्रिकेट, फुटबॉल, विटी-दांडू आदी खेळ खेळले जात असल्याने ट्रॅक फाटला होता. तो दोनदा दुरुस्त करण्यात आला. क्रीडाप्रेमींकडून वारंवार मागणी करूनही साहित्याचा पत्ता नव्हता. शाळा, महाविद्यालय आणि खासगी स्पोटर््स क्लबकडून साहित्य आणून शालेय आणि सब ज्युनिअर स्पर्धा उरकण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती. यामध्ये संयोजक भरडले जात होते. साहित्याची ने- आण करावी लागत असल्याने येथे स्पर्धा संयोजनास अनेकांनी नकार दिला होता. अखेर ३ महिन्यांपूर्वी हे साहित्य खरेदी केले गेले. उंच, लांब, बांबू उडीचे साहित्य, अडथळा शर्यतीचे हर्डल्स, गोळा, हातोडा, भाला, थाळी, मोजणीचे साहित्य, स्टॉप वॉच, स्टार्टिंग बोर्ड, स्टार्टिंग स्टॅण्ड आदी साहित्य मैदानाच्या गोदामात आणून कुलूपबंद केले आहे. तीन हजार मीटर धावणे स्टिपलचेस हा अडथळा आणि पाण्यातून उडी टाकत पळण्याचा एक क्रीडा प्रकार आहे. यासाठी एकूण ५ लाकडी अडथळे लागतात. मात्र, केवळ एकच अडथळा महापालिकेने खरेदी केला आहे. त्यामुळे हा क्रीडा प्रकार घेता येणार नाही. त्याचबरोबर अनेक साहित्य अद्याप खरेदी केले गेले नाही. यामुळे अनेक क्रीडाप्रकार घेता येणार नाहीत. थाळी आणि हातोडा फेकीच्या बाजूने असलेली संरक्षक जाळी अपुरी असल्याने या फटीतून थाळी किंवा हातोडा बाहेर पडून एखादी दुर्घटना घडू शकते. मैदानात लांब उडीचे टेक आॅफ बोर्डच्या लाकडी पट्ट्या निघाल्या आहेत. त्यामुळे लांब आणि तिहेरी उडीचा सराव करणे अडचणीचे ठरत आहे. मैदानाच्या बाजूने गॅलरी नसल्याने खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि पंचांना नाईलाजास्तव उन्हात उभे राहावे लागते. संकुलात निवासव्यवस्था नसल्याने राज्यस्तरीय स्पर्धा येथे घेता येणार नाहीत. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंना निवासव्यवस्था नसल्याने अशा स्पर्धांचे आयोजन करणे गैरसोईचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचे अज्ञानमहापालिकेच्या क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांना अ‍ॅथलेटिक्स खेळासंदर्भात बरेच अज्ञान आहे. साहित्य खरेदी करण्यापूर्वी अ‍ॅथलेटिक्सच्या तांत्रिक पंच आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करणे गरजेचे होते. तसे क्रीडा विभागास सांगण्यात आले होते. मात्र, त्यावर योग्य ती कार्यवाही न झाल्याने आवश्यक साहित्य अद्याप उपलब्ध झालेले नाही. दरम्यान, गेल्या महिन्याअखेरीस झालेल्या शालेय विभागीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत काही साहित्य वापरले गेले. महापालिकेच्या दत्तक योजनेतील खेळाडूंना सरावासाठी काही साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.