शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

‘एनआरसी’मुळे राज्यघटनेचा आत्मा रक्तबंबाळ : डॉ. गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:44 IST

संविधानासह कुठेही धर्माचा संदर्भ देऊन नागरिकत्वाचा विचार केलेला नाही...

ठळक मुद्देराष्ट्रसेवा दलातर्फे  एनआरसी विरोधी परिषद

पुणे : राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याचे (एनआरसी) दुरूस्ती विधेयक मंजुर होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिकात्वाला धर्माचे विशेषण जोडले जाईल. संविधानासह कुठेही धर्माचा संदर्भ देऊन नागरिकत्वाचा विचार केलेला नाही. त्यामुळे ‘एनआरसी’ देशभरात लागु झाल्यास राज्यघटनेचा आत्मा रक्तबंबाळ होईल, अशी भीती ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली. राष्ट्र सेवा दलातर्फे साने गुरूजी स्मारक येथे रविवारी आयोजित ‘एनआरसी विरोधी परिषदेत’ ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढावा, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, युवक क्रांती दलाचे डॉ. कुमार सप्तर्षी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो, शेतकरी नेते रंगा राचूरे, रजिया पटेल, धनाजी गुरव उपस्थित होते. ‘एनआरसी’ला विरोध करत सर्वच वक्त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.डॉ. गणेश देवी यांनी केंद्र सरकारच्या भुमिकेवर टीका केली. ते म्हणाले, घुसखोरांना शोधून काढण्यासाठी ‘एनआरसी’चा वापर करण्याचे हे मुर्खपणाचे काम जगातील कोणत्याही सरकारने केलेले नाही. पण भारत सरकारकडून विशिष्ट हेतूने घुसखोरीची भीती दाखवून ही दुरूस्ती करत आहेत. हिटलरने ज्युंवर केलेल्या अत्याचाराप्रमाणेच भारतातील मुस्लिम, आदीवासी, दलितांची स्थिती होईल. त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्याचा हा प्रयत्न आहे. विविध रूपाने सरकारकडे नागरिकांची सर्व माहिती उपलब्ध असताना एनआरसी कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा फॅसिझम खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी ‘पिपल रजिस्टर आॅफ पिपल्स’ हे लोकांनीच तयार करायला हवे. त्याची सुरूवात कर्नाटकमध्ये होत आहे. हिंदुत्व हा सत्तावाद असून बंधुत्व नाही, असे स्पष्ट करून सप्तर्षी म्हणाले, ‘सध्याचे केंद्र सरकार पाशवी  बहुमत असलेले आहे. राष्ट्राची मोडतोड, स्वातंत्र्याच्या मूल्यांची मोडतोड करून हिंदू राष्ट्राचे मूल्य आणणारे सरकार आहे. यापासून सावध राहायला हवे. ‘एनआरसी’वर बहिष्कार घालायला हवा.’ परिषदेत सहभागी इतर वक्त्यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. ‘एनआरसी’विरोधात सर्व घटकातील नागरिकांनी एकत्र येऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आणि एनआरसीला विरोध करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  

...........

मुस्लिम, ख्रिश्चन, साम्यवादी यांना आरएसएस शत्रु मानतो. गोळवलकर यांनी आपल्या पुस्तकात असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांच्या अजेंड्यावर मुस्लिम आहेत. हिंदु-मुस्लिम भावना पेटवून निवडणुक जिंकता येते, हे त्यांना पाहिले आहे. त्यांना स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रवादी नव्हे तर धार्मिक राष्ट्रवाद हवा आहे. इंग्रजानी किमान काही नीतीमुल्य सांभाळली होती. पण सध्या तशी स्थिती नाही.- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार