शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

प्रवासी पुण्यात सामान पाटण्यात ! स्पाईसजेटचा अजब कारभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:12 IST

विमानाने प्रवासी पुण्यात आले तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. प्रवाशांना या प्रकारच्या बदलांची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रवासी आले पण सामानाविनाच, पुणे विमानतळावर गोंधळाचे वातावरण !पाटणा - पुणे या जेटस्पाईस कंपनीचा भोंगळ कारभार, प्रवाशांना मनस्ताप

पुणे : विमानाने प्रवासी पुण्यात आले तरी  त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. प्रवाशांना या प्रकारच्या बदलांची कोणतीही कल्पना न दिल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

      पाटणा ते पुणे अशी नवी विमानसेवा पाच दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली. मोठे अंतर काही तासात पार होणार असल्याने अनेकांनी त्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता.त्यानंतर आज सकाळी १० वाजता पाटण्याहून एसजी ३७६ही फ्लाईट होती. मात्र काही कारणाने सुमारे ५० मिनिट उशिराने फ्लाईट निघाली. त्यानंतर १वाजून ४० मिनिटांनी पुण्यात उतरणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ उलटूनही सामान मिळाले नाही. विमान प्रशासनाकडे अधिक चौकशी केली असता वजन जास्त झाल्याने त्यांना न विचारताच त्यांचे सामान काढून ठेवल्याचे उत्तर देण्यात आले. यात सुमारे ५० प्रवाशांच्या सामानाचा समावेश आहे. 

        या सामानात काही प्रवाशांच्या कपड्यांसह घराच्या चाव्या, कार्यालयाची कागदपत्रे आहेत. . त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून न विचारता सामान काढून कसे ठेवले असा सवालही विचारला आहे. याबाबत संबंधित कंपनीने चूक मान्य केली असून उद्या सामान घरपोच करण्याचा वायदा केला आहे. पण यामुळे झालेला मनस्ताप आणि होणारे परिणाम यासाठी मनाने कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला हवी असे मत प्रवासी कौशल झा यांनी व्यक्त केले. विमानतळ प्रशासनाशी संपर्क केला असता तिथून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. आदिती खेतान या पाटण्यातील विद्यार्थिनीचा यात समावेश असून आज एमआयटी कॉलेजमध्ये तिला ऍडमिशन घ्यायची होती. मात्र तिचे सर्व कागदपत्र बॅगेत असून सर्व सामान पाटण्यात राहिले आहे. अनामिक नावाची विद्यर्थिनीही अडचणीत असून तिला सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घ्यायचा असून कॉलेज आणि होस्टेलसाठी भरलेल्या पैशांचा डीडी  असलेली बॅगही आणण्यात आलेली नाही. तिचे पुण्यात कोणीही नातेवाईक नसल्याने आजचा दिवस आणि रात्र कुठे राहू असा सवाल तिच्यापुढे आहे.

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळTravelप्रवास