शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गावांमधील पैसे गावातच खर्च करावे; हवेली तालुका कृती समितीने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:02 IST

समाविष्ट गावांमधील आवश्यक कामांसाठी निधी देण्यास नकार मिळाल्याबद्धल गावांमध्ये नाराजीची भावना आहे. असे असेल तर या गावांमधून मिळणारा पैसे शहरात खर्च न करता गावांमध्येच करावा अशी मागणी हवेली तालुका कृती समितीने केली आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी यापद्धतीने कामांची अडवणूक करणार असतील तर ते योग्य नाही : श्रीरंग चव्हाणसमाविष्ट गावांमधील आवश्यक कामांसाठी निधी देण्यास नकार मिळाल्याबद्धल गावांमध्ये नाराजी

पुणे : समाविष्ट गावांमधील आवश्यक कामांसाठी निधी देण्यास नकार मिळाल्याबद्धल गावांमध्ये नाराजीची भावना आहे. असे असेल तर या गावांमधून मिळणारा पैसे शहरात खर्च न करता गावांमध्येच करावा अशी मागणी हवेली तालुका कृती समितीने केली आहे. तसेच ११ गावांचा यापूर्वीचा ५० कोटी रूपयांचा निधीही गावांमध्येच वापरावा असे समितीने सूचवले आहे.न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील विकास कामांसाठी महापालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या प्रभाग विकास निधीमधून काही रक्कम वर्ग करून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे स्थायी समितीने व सर्वसाधारण सभेनेही हा प्रस्ताव नाकारला व अंदाजपत्रकात स्वतंत्र लेखाशिर्ष तयार करून त्यात मोठ्या प्रकल्पांचा अखर्चित निधी टाकावा, त्यातून कामे करावीत असे प्रशासनाला सांगितले.गावांच्या महापालिकेतील समावेशासाठी प्रयत्न करणारे हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी याबद्धल खंत व्यक्त केली. महापालिकेतून चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही समावेशाची मागणी केली आहे. पदाधिकारी यापद्धतीने कामांची अडवणूक करणार असतील तर ते योग्य नाही. आम्ही काही लगेचच मोठया कामांची मागणी करीत नाहीत, पण सार्वजनिक आरोग्यसारखी आवश्यक कामे झालीच पाहिजेत, ती आता महापालिकेचीच जबाबदारी आहे असे ते म्हणाले.प्रशासनाने केलेल्या मागणीत काहीही चुकीचे नाही. शहराच्या मध्यभागात विकास कामांसाठी काही संधी नसते. तरीही सत्ताधारी गटातील नगरसेवकांना प्रभाग विकास निधीसाठी अंदाजपत्रकात काही कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यातील काही रक्कम त्यांनी गावांमधील अत्यावश्यक कामांसाठी वर्ग करून द्यायला हरकत नव्हती, मात्र त्याला नकार देण्यात आला व स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्याची सूचना करण्यात आली. याचा अर्थ आता या गावांनी पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार होईपर्यंत वाट पहायची का असा सवाल चव्हाण यांनी केला.सरकारने गावांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, अशी टीका त्यांनी केली. वास्तविक समावेश करतानाच सरकारने महापालिकेला काही निधी द्यायला हवा होता. तो दिला नाही. या गावांमधून सरकारने विकासनिधी म्हणून अनेक वर्षे पैसे जमा केला आहेत. ते सरकारने द्यावेत. तसेच विसर्जीत ग्रामपंचायतींचा ५० कोटी रूपयांचा निधी शिल्लक आहे, तोही वर्ग करावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. तसेच आता महापालिका संबधित गावांमधून मिळकत कर वसूल करत आहे. हा वसूल झालेला सर्व कर फक्त गावांमधील विकासकामांसाठीच वापरावा असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे