शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Pune Metro: पुणे मेट्रोची खास ऑफर; महिनाभर 'या' कार्डद्वारे अमर्यादित प्रवास करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:12 IST

आजपासून ही सेवा उपल्बध करून देण्यात येणार

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मेट्रो उदघाटनानंतर शहरातील मेट्रो सुरु करण्यात आली. मेट्रोला मंजुरी मिळल्यानंतर तब्बल ७ वर्षानंतर पुणेकरांना मेट्रो पाहायला मिळाली आहे. या उत्साहात नागरिकांनी अतिशय आनंदात मेट्रोने प्रवासही केला. त्यामध्येच आता पीएमपीनेही हातभार लावला आहे. पीएमपीने मेट्रो स्थानकापर्यंत जाता येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने जाहीर केले आहे. आता पुणे मेट्रोने नागरिकांसाठी महिनाभराची खास ऑफर काढली आहे. पुणेकरांसाठी ट्रॅव्हल कार्ड सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. आजपासून ही सेवा उपल्बध करून देण्यात येणार असल्याचे महामेट्रोने सांगितले आहे. 

पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळ स्टॉप, आणि गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक, येथे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत तिकीट खिडकीवर उपलब्ध होणार आहे. कार्डसाठी  (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, मतदान कार्ड, शाळेचे ओळखपत्र) यापैकी ओळख पुराव्यांसह फोटो सादर करावे लागणार आहेत. कार्डची किंमत ५०० रुपये असून ते ३० एप्रिलपर्यंत अमर्यादित प्रवासासाठी वापरले जाता येणार आहे. अशी माहिती महामेट्रोने दिली आहे.  

भुयारी मार्ग वर्षअखेरीस सुरु होणार 

शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मार्ग पूर्ण भूयारी आहे. मंडईपासून पुढे कसबा पेठेपर्यंतचा एक भाग वगळता येणारा व जाणारा असे दोन्ही बोगदे आता पूर्ण झाले आहेत. बोगदा खोदला जात असतानाच त्याला क्राँक्रिटचे अस्तर तयार होत जाते. या ट्यूबमध्ये आता रूळ टाकण्याचे तसेच वि्द्यूत तारा, दिवे बसवण्याचे काम सुरू आहे. या ५ किलोमीटरच्या भूयारी मार्गात ५ स्थानके आहेत. त्यापैकी शिवाजीनगर स्थानकाचे काम गतीने होत आहे.स्थानकात दोन्ही बोगदे एकत्र होतात व स्थानकाचे अंतर संपले की पुन्हा स्वतंत्र होतात. सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट या स्थानकांची कामे सुरू आहेत. भूयारी मार्गाचे कामही पूर्ण करून त्यातून वर्षअखेरीस मेट्रो सुरू करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोpassengerप्रवासीticketतिकिटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका