व्याख्यानाच्या सुरूवातीला कार्यक्रमांचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
प्रा. नीलिमा पुराणिक म्हणाल्या,‘‘ समाजामध्ये स्त्रियांची भूमिका अबाधित राखण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, त्यांना मूलभूत शिक्षणाबरोबरच कामाच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षितता प्रदान करणे काळाची गरज बनत चालली आहे. यासाठी आपण सर्वांनी सामाजिक बांधणी या माध्यमातून पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्त्री- शिक्षण हे समीकरण अगदी बालवयातच प्रत्येकाच्या आईच्या माध्यमातुन अंगी रुजविले जाते. यासाठी अगदी आपल्या लहान वयातील संस्कार किती महत्त्वपूर्ण आहेत.’’
ॲानलाईन व्याख्यानाचे संयोजक नियोजन आणि सूत्रसंचालन प्रा. संतोष सास्तुरकर यांनी केले. तर डॉ. अर्जुन डोके यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॅा. क्रांती बोरावके, प्रा. सविता वासुंडे प्रा. दीपाली चिंचवडे, प्रा. रोहिणी येवले ,प्रा. ज्ञानेश्वर जांभूळकर, प्रा. अमृता इनामदार, डॉ. अर्जुन डोके, प्रा. रुशांत नांदखिळे, प्रा.सद्दाम घाटवाले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
झुम ॲप व यु - ट्यूब लाइव्ह वर आयोजित या ॲानलाइन व्याख्यानामध्ये महाविद्यालयातील सुमारे २५० पे जास्त विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.