शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळणार विशेष अधिकार

By राजू इनामदार | Updated: February 5, 2025 15:31 IST

राज्य सरकारचा निर्णय : एक लाख ९४ हजार नियुक्त्या करणार

राजू इनामदार

पुणे : आघाडी सरकारच्या काळात अधिकारांविना जवळपास व्यपगत (रद्द) झालेली विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे पुनरूज्जीवित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी एक लाख ९४ हजार पदांची निर्मिती करण्यात येणार असून, त्यांना तब्बल १४ प्रकारचे विशेष अधिकारही बहाल करण्यात येणार आहेत. महसूलमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची एक समिती या कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड करणार असून, त्यात महिलांना ३३ टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे.

या पदावर निवड होणाऱ्यांना १४ प्रकारचे अधिकार मिळतील. ग्रामसभेचे ते विशेष निमंत्रित सदस्य असतील. सरकारच्या विविध योजना, दक्षता समिती तसेच प्रशासन व पोलिसांमध्ये नागरिकांना अनुषंगून समन्वय साधणे असे विविध अधिकार या पदाला दिले जाणार आहेत. वय २५ पेक्षा कमी नसावे, ६५ पेक्षा जास्त नसावे, शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी, (ग्रामीण दुर्गम भागात इयत्ता ७ वी), राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे, गुन्हेगारी कारणासाठी शिक्षा झालेली नसावी, असे नेहमीसारखेच निकष सरकारने या विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी ठेवले आहेत. प्रत्येकी ५०० मतदारांमागे १ याप्रमाणे राज्यात १ लाख ९४ हजार पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.

सत्ताधारी राजकीय पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांना काही जबाबदारी देण्यासाठी म्हणून या मानद पदांची निर्मिती करण्यात आली होती. त्यांंना दाखले तसेच अन्य काही कागदपत्रे सत्यप्रतींमधील आहेत दर्शवण्यासाठी शिक्का व स्वाक्षरी करण्याचे अधिकार होते. मात्र, काही वर्षांपूर्वी संबधित अर्जदाराने प्रतिज्ञापत्र (ॲफेडेव्हिट) करून दिले तरी ते मान्य करण्याचा निर्णय झाला व या पदांना असलेले एकमेव अधिकार गेले. त्यानंतर ही पदे जवळपास व्यपगत झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडी सरकारच्या काळात, त्यानंतरच्या भाजप-शिवसेना युतीच्या सत्ताकाळात व मागील ५ वर्षांत महाविकास आघाडी व महायुती सरकारच्या काळातही या पदांचा कोणताही विचार झालेला नव्हता. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे नाराजी होती.

विद्यमान सरकारने व त्यातही सरकारीमधील भारतीय जनता पक्षाने मात्र आता या पदांचे पुनरूज्जीवन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून ही पदे भरली जातील. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महसूलमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांची त्रीसदस्यीय समिती या पदांसाठीची निवड करेल. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीचा सरकारी निर्णय (विकाअ-११२५-प्र.क्र.-का-५) जाहीर केला आहे.सरकारच्या या निर्णयाची भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर लगेचच ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशा शब्दांमध्ये भलामण करण्यात आली आहे. त्यातच पदसंख्या, त्यांचे अधिकारी याविषयी विस्ताराने नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच ही पदे सरकारी कामासाठी की सरकारमध्ये आपले कार्यकर्ते घुसवण्यासाठी अशी टीका अन्य राजकीय पक्षांमधून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड