शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलांनी लुटला हुर्डा पार्टीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:19 IST

शक्यतो हुर्डा पार्टीचा आनंद परिवारासह घेतला जातो. सामाजिक कार्यात असलेले लोक मित्रमंडळी व राजकीय व्यक्तींसह हा आंनद घेतात; मात्र विशेष मुलांना हा आंनद मिळवून देऊन वेगळ्या सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श बांधकाम व्यावसायिक मनोज व मुकेश छाजेड यांनी निर्माण केला आहे.

कात्रज - शक्यतो हुर्डा पार्टीचा आनंद परिवारासह घेतला जातो. सामाजिक कार्यात असलेले लोक मित्रमंडळी व राजकीय व्यक्तींसह हा आंनद घेतात; मात्र विशेष मुलांना हा आंनद मिळवून देऊन वेगळ्या सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श बांधकाम व्यावसायिक मनोज व मुकेश छाजेड यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या आई शांताबाई यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या परिवारासह हुर्डा पार्टीचा आनंद घेत असताना, त्यांची आई शांताबाई छाजेड यांनी अनाथ व अपंग मुलांनाही असा आनंद मिळवून देण्याबाबत सांगितले. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची दोन्ही मुले मनोज व मुकेश छाजेड यांनी खडकवासला येथील त्यांच्या सिंहगड सृष्टी येथे पुण्यातील विविध अपंग व मतिमंद शाळेतील मुलांसाठी दिवसभर विविध खेळ, जेवण, नाष्टा व हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. सर्वेषा सेवा संघ, बालकाश्रम, आपलं घर, अविश्रि बालसदन, अनिकेत मतिमंद शाळा, अन्नपूर्णा आश्रमशाळा अशा अनेक संस्थांच्या एकूण २०० मुलांनी व आजी-आजोबांनी हुरडा पार्टीचा मनसोक्त आनंद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनदेखील केले होते. प्रसिद्ध निवेदक नकुल संघवी यांनी मुलांसाठी विविध खेळाचे आयोजन केले. मनोज छाजेड, मुकेश छाजेड, योगेंद्र चोरडिया, ललित शिंगवी, दिनेश मुनोत, नकुल संगवी यांनी प्रयत्न केले. सुरेखा भुरट यांच्यातर्फे सर्व मुलांना ब्लँकेटवाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, अनघा देशमुख, उज्ज्वला मिरघे आदींनी या अभिनव उपक्रमाला भेट देऊन कौतुक केले.या वेळी अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, राष्ट्रवादी पुणे शहर चिटणीस प्रशांत गांधी, तुषार कानोजे, पंकज कावठिया, सिद्धेश माळवदकर, नचिकेत शेडगे, इम्रान शेख इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.मी नेहमी विविध अनाथाश्रमांना भेट देत असते. मी माझ्या परिवारासह हुर्डा पार्टीचा आनंद घेत असताना अचानक मला या मुलांची आठवण झाली. मुलांना त्याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने हा उपक्रम राबविल्याने समाधान वाटले. - शांताबाई छाजेड

टॅग्स :Puneपुणे