शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयात विशेष शिबिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 14:28 IST

सद्यस्थितीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत..

पुणे : जिल्ह्यात युवा नवमतदार नोंदणीसाठी २५ नोव्हेंबर रोजी ४४२ महाविद्यालयात एकाचवेळी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरात ३१ हजार ६४७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित  प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदार यादीत एकूण ७८ लाख ७६ हजार ९५०  मतदार समाविष्ट आहेत. सद्यस्थितीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

 पुणे जिल्ह्यात १७ वर्षावरील भावी मतदारांची व १८ वर्षावरील अर्हता पात्र युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युवा मतदार नोंदणी वाढवून मतदार यादीचे सशक्तीकरण करण्यासाठी या युवा वर्गाला मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करुन त्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्काविषयी जागरुक करण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या ४४२ महाविद्यालयांमध्ये मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. 

या विशेष शिबिरात युवा मतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण आयोजित करुन नमूना क्र. ६ चा अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.  नवमतदारांनी नमुना क्र. ६ चा अर्ज भरून शिबीरास चांगला प्रतिसाद दिला.

अद्याप नोंदणी न झालेल्या नवमतदारांसाठी ५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व पात्र युवामतदारांना महाविद्यालयातील विशेष शिबिरात नावनोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेऊन युवा मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानElectionनिवडणूक