शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सहाय्यक सरकारी वकिलांना नियमित सेवेत रुजू करून घ्यावे; वकिलांच्या संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 19:24 IST

सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात अंदाजे १६०० प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्यरत असून, अंदाजे ३०० ते ३५० विशेष सहायक सरकारी वकील आणि किमान ५५१ सहाय्यक सरकारी वकील कार्यरत आहेत.

पुणे :  राज्यातील २१५ सरकारी वकिलांना बढती देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयांमध्येवकिलांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे जवळपास १६०० कोर्टात ३५० विशेष सहायक सरकारी वकील आणि ३४० नियमित सहाय्यक सरकारी वकील यांना कामकाज करावे लागणार आहे. त्यांच्यावर कामाचा ताण वाढणार आहे. सद्य स्थितीत कंत्राटी पद्धतीवर काम करणा-या विशेष सहाय्यक सरकारी वकिलांना केवळ 1000 रुपये तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. तरी विशेष सहाय्यक सरकारी वकिलांना नियमित सेवेत  रुजू करून घ्यावे अथवा निश्चित पगार 80 हजार रूपये व  निवृत्तीचे वयापर्यंत कार्यरत राहण्याची संधी द्यावी अशी विशेष सहाय्यक सरकारी वकील संघटना, महाराष्ट्र राज्य तर्फे मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, एमपीएससीमार्फत नियुक्त केलेल्या सहाय्यक सरकारी वकिलांना ९०००० रूपयांपेक्षा जास्त पगार व इतर देय/भत्ते दिले जातात. परंतु सहाय्यक सरकारी वकिलांइतक्या कर्तव्य जबाबदा-या पार पाडून देखील विशेष सहायक सरकारी वकिलांना तुटपुंजे प्रती दिन १००० रूपये  इतके मानधन देण्यात येते. तेही मे. कोर्टात सुनावणी झाली तरच मिळते.  म्हणजे कोर्ट रजेवर असले, आरोपीचे वकील हजर नसले, साक्षीदार हजर नसले या आणि अश्या ब-याच कारणामुळे कामकाज पुढे ढकलण्यात आले, आणि सुनावणी झाली नाही म्हणून त्याचा भुर्दंड विशेष सहायक सरकारी वकिलांना भोगावा लागतो. कारण त्या दिवसाचे मानधन अशा परिस्थितीत आम्हाला कारण काहीही असो मागताच येत नाही, ही एक प्रकारे आमच्या मूलभूत हक्कांची पायमल्लीच आहे.  

सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात अंदाजे १६०० प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्यरत असून, अंदाजे ३०० ते ३५० विशेष सहायक सरकारी वकील आणि किमान ५५१ सहाय्यक सरकारी वकील कार्यरत आहेत. राज्यातील सरकारी वकिलांना अतिरिक्त सरकारी वकील म्हणून बढती मिळाल्याने विशेष सहाय्यक सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील यांच्यावर कामाचा ताण पडणार आहे. सध्याची वास्तविक परिस्थिती पाहता ३ ते २० वर्षांपासून केवळ तुटपुंज्या १००० रूपयांच्या कमाल मर्यादेवर प्रती दिन मानधनावर कार्यरत असलेल्या विशेष सहायक सरकारी वकिलांना नियमित सेवेत रूजू करून घ्यावे अशी राज्य सरकारकडे वेळोवेळी विनंती करून देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्य सरकार कडून न्याय मिळत नसल्याने २५(३) प्रमाणे नियुक्त आम्ही विशेष सहाय्यक सरकारी वकील केंद्र सरकारकडे न्यायाची मागणी करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलCourtन्यायालय