शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवरून बोलणे धोकादायक; २९ हजार वाहनचालकांवर कारवाई, ५८ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:16 IST

वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या २९ हजार ३५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देमोबाइल केवळ फॅशन राहिला नसून झाली मूलभूत गरजमोबाइलवर बोलणाऱ्या २९ हजार ३५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी केली कारवाई

पुणे : मोबाइल हा आता आपल्या जीवनाचा भाग बनला आहे़ आपल्यापासून तो एक क्षणही दूर असू नये, जर तो दूर झाला तर आपण जगात मागे पडू, अशी भावना तरुणाईमध्ये निर्माण होत आहे़ वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असते़ असे असले तरीही वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या २९ हजार ३५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली़ त्यांच्याकडून तब्बल ५८ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ मोबाइल हा आता केवळ फॅशन राहिला नसून ती मूलभूत गरज झाली आहे़ असे असले तरी आपल्या जीवापेक्षा ते कधीही महत्त्वाचे नसते़ पण, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही़ विशेषत: मोटार सायकल चालवताना  बोलणारे तर त्यात आघाडीवरच असतात़ अनेक मोटारचालक हँड्स फ्री सिस्टीम घेतात़ तर काही जण स्टेअरिंगसमोरच मोबाइल स्टँड लावून ठेवतात़ कॉल आला की स्पिकर आॅन करून चालत्या गाडीवरच बोलताना दिसतात़ त्यांचे अर्धे लक्ष मोबाइलकडे आणि अर्धे लक्ष समोर असते़ त्यात गाडी वेगात असले तर अपघाताचा धोका आणखीच वाढतो.

विना गिअरच्या गाड्या अधिक धोकादायकआता विना गिअरच्या दुचाकी गाड्यांचे प्रमाण वाढल्याने केवळ अ‍ॅक्सिलेटरवर हात ठेवला तरी गाडी चालवता येत असल्याने डाव्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे़ या वाहनचालकांचे अर्धे लक्ष मोबाइलवरील व्यक्ती काय बोलतेय, याकडे असते़ मोबाइलवर बोलणारी व्यक्ती आपल्या गाडीचा वेग कमी करते़ त्यात आजूबाजूच्या वाहनांचे आवाज व मागील वाहनांकडून वाजविले जाणारे व्हॉर्न यामुळे आपले लक्ष विचलित होऊ शकते़ त्यातून अपघाताची शक्यता अधिक वाढते़ विना गिअरची गाडी चालविणारे वाहनचालक गाडी चालवत असताना व्हॉट्सअ‍ॅपवरचे संदेश वाचत असतात़ हे संदेश वाचताना त्यांचे ड्रायव्हिंगवरील संपूर्ण लक्ष उडालेले असते़ त्यामुळे अचानक कोणी मध्ये आल्यास अपघाताची दाट शक्यता असते़ 

टॅग्स :MobileमोबाइलPuneपुणे