शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या, खरिपाची १० टक्केच पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 03:24 IST

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे.

वालचंदनगर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यातही अद्याप पावसाचे थेंब नसल्याने खरिपाच्या पेरणीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. तालुक्यात या वर्षी सरासरी फक्त १० टक्केच खरिपाची पेरणी झालेली असून तेही मकाचे पिके घेण्यात आलेले असल्याने या वर्षी उडीद, मूग, सोयाबीन पेरणीआभावी गायब होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.तालुक्यात दर वर्षी पाऊस पाठ फिरवत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालवली आहे. विहिरी, विंधनविहिरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ९० टक्के वेळेवर खरीपाची पेरणी झालेली होती. त्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण होते. या वर्षी हवामान खात्याने आवश्यकतेपेक्षा जास्तच पाऊस पडणार असल्याचे भाकीत करण्यात आलेले असल्याने एप्रिल, मे महिन्यात शेतकºयांनी शेतावर मशागत करून जमिनी पेरणीयोग्य करून ठेवण्यात आलेल्या आहेत. जून महिन्यात मृग नक्षत्रात जोरदार पावसाचे आगमन झालेले होते.त्यामुळे शेतकºयांच्या खरिपाच्या पेरणीच्या अपेक्षा पल्लवीत झालेल्या होत्या. परंतु जूननंतर पेरणीयोग्य पाऊस पडलाच नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. जुलै महिन्यात पिके खुरपणीला येत असतात. परंतु अजूनही पेरणीच झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. विहिरीच्या जोरावर तालुक्यात १० टक्के जनावरांच्या चारापाण्यासाठी मका पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे. अन्यथा खरिपाच्या पेरणीची तिफण चाललीच नसल्याने चिंता लागून राहिली आहे.दररोज डोक्यावर ढगांचे थैमान काळेकुट्ट ढग पाहावयास मिळत आहे. परंतु हुलकावणी देऊन निघून जात असल्याने शेतकºयाने अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत. तालुक्यातील कृषी अधिकारी सूर्यकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या वर्षी या महिन्यात संपूर्ण शंभर टक्के पेरणी करण्यात आलेली होती. उडीद, मूग, सोयाबीन, तूर पिके वंचित राहिली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस