पुणे : लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांनी सदर्न कमांडचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पुण्यात आगमन होताच त्यांनी नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर रावत यांना मानवंदना देण्यात आली. बिपिन रावत १६ डिसेंबर १९७८ रोजी लष्करात दाखल झाले. डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतर्फे त्यांना ‘स्वोर्ड आॅफ आॅनर’ने सन्मानित करण्यात आले होते. सदर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या ठिकाणी जनरल आॅफिसर कमांडिंग म्हणून काम पाहिले आहे. बिपिन रावत यांनी सिमला येथील सेंट एडवर्ड स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. डेहराडूनमधील आयएमएतर्फे त्यांची इलेव्हन गोरखा रायफलच्या पाचव्या बटालियनसाठी निवड झाली. त्यानंतर त्यांनी इनफंट्री बटालियन म्हणूनही काम पाहिले आहे.(प्रतिनिधी)
सदर्न कमांडचे बिपिन रावत नवे प्रमुख
By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST