शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गाची ध्वनी व कंपन चाचणी होणार, खांबावर बसला पुलाचा एक भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 06:19 IST

शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या ५ किमी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यापुर्वी केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे महामेट्रोच्या वतीने लवकरच ध्वनी व कंपन चाचणी घेण्यात येणार आहे. रस्त्याच्या खाली तब्बल २८ मीटर खोल बोगदा खणून त्यातून मेट्रो जाणार आहे. शिवाजीनगरहून ते फडके हौद मार्गे ती पुढे स्वारगेटकडे निघेल.

पुणे : शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या ५ किमी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यापुर्वी केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे महामेट्रोच्या वतीने लवकरच ध्वनी व कंपन चाचणी घेण्यात येणार आहे. रस्त्याच्या खाली तब्बल २८ मीटर खोल बोगदा खणून त्यातून मेट्रो जाणार आहे. शिवाजीनगरहून ते फडके हौद मार्गे ती पुढे स्वारगेटकडे निघेल.महामेट्रोच्या या कामाचे प्रमुख अभियंता गौतम बिºहाडे यांनी ही माहिती दिली. शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रोचा मार्ग भुयारी आहे. असा भुयारी मार्ग करण्यापूर्वी काही चाचण्या घेणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्या मार्गाच्या वर असणाºया इमारती, जुन्या वास्तू यांना कसलाही धोका होऊ नये, यासाठी ही चाचणी घेण्यात येत असते. त्यात काम सुरू असताना निर्माण होणारी कंपने किती परिणामकारक ठरू शकतील, हे तपासले जाते. तसेच काम करताना निर्माण होणाºया आवाजापासून त्रास होतो आहे किंवा नाही हेही पाहिले जाते. या चाचण्या करून त्यातील निष्कर्षाप्रमाणे काम करण्याच्या पद्धतीत बदल केले जात असतात. या क्षेत्रातील अत्यंत तज्ज्ञ व्यक्तींकडून ही चाचणी घेतली जात असते.हा भुयारी मार्ग जमिनीत रस्त्यापासून तब्बल २८ मीटर खाली असेल. त्यामुळे वरील कोणत्याही इमारतीला कसलाही धोका होण्याची शक्यता नाही, असे बिºहाडे यांनी स्पष्ट केले. इतक्या खोलवर कोणत्याही इमारतीचा पाया येत नाही. तसेच जलवाहिन्या, सांडपाणी, मैलापाणी वाहून नेणारी व्यवस्था किंवा तारा वगैरे जमिनीपासून फार तर काही फूट खोलीवर असतात. त्यामुळे त्यांचीही तोडफोड होण्याचा काही विषय नाही, असे बिºहाडे यांनी सांगितले.वनाज ते रामवाडी या मार्गाचा सुमारे ५ किमीचा भाग नदीपात्रातून जातो. त्याचे सुमारे ६० खांब नदीपात्रात असतील. नदीपात्रातील कामावरून हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल आहे. त्यांनी दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करूनच तिथे काम सुरू आहे, असे बिºहाडे यांनी सांगितले.मेट्रोच्या रस्त्यामध्ये असणाºया खांबावरील मेट्रो धावणाºया पुलाचा एक भाग नाशिक फाट्याजवळच्या खराळवाडी येथे बसवण्यात आला. ४५ टनाचा हा भाग नाशिक फाट्यापासून पुढे एका खासगी जागेवर सुरू करण्यात आलेल्या कास्टिंग यार्डमध्ये तयार करण्यात आला. असे बरेच भाग तिथे तयार करण्यात आले आहे. पुलाचे खांब तयार होतील तसे ते आता त्यावर बसवण्यात येतील. २८ मीटर अंतरावर दोन खांब असतात व त्यामध्ये असे १२ ते १५ भाग असतात, अशी माहिती बिºहाडे यांनी दिली. वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा दोन्ही मार्गांचे काम जोरात सुरू असून येत्या महिनाभरात दोन्ही मार्गांच्या काही भागात खांब व त्यावरचा पुलाचा भाग बसवण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणे