शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात डीजेबंदीनंतरही ध्वनीप्रदुषण झालेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 20:57 IST

लक्ष्मी रस्त्यावर डीजेचा थरार कमी झाला तरी ध्वनी प्रदुषणाची पातळी जवळपास तेवढीच राहिली. डीजे बंदीमुळे यंदा ध्वनीप्रदुषणाबाबत उत्सुकता होती.

ठळक मुद्देरविवारी दुपारी १२, ४ व रात्री ८ वाजता आणि सोमवारी मध्यरात्री १२, पहाटे ४ आणि सकाळी ८ वाजता नोंदीमानाच्या गणेश मंडळांसह अनेक मंडळांनीही पांरपारिक वाद्यांना प्राधान्य ढोल-ताशाच्या गजराने मागील वषीर्चीच ध्वनीपातळी

पुणे : मुख्य विसर्जन मिरवणुक मार्ग असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर डीजेचा थरार कमी झाला तरी ध्वनी प्रदुषणाची पातळी जवळपास तेवढीच राहिली. ढोल-ताशाच्या गजराने मागील वषीर्चीच ध्वनीपातळी गाठली. त्यामुळे डीजेवर बंदी घातल्यानंतरही पुणेकरांना ध्वनीप्रदुषणाला सामोरे जावे लागले.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील चौकांमध्ये ध्वनीपातळी मोजली जाते. यंदाही दहा चौकांमध्ये रविवारी दुपारी १२, ४ व रात्री ८ वाजता आणि सोमवारी मध्यरात्री १२, पहाटे ४ आणि सकाळी ८ वाजता नोंदी घेण्यात आल्या. त्यामुळे ध्वनीपातळीच्या पातळीत किंचित घट झाल्याचे दिसून आले. सर्व चौकांमध्ये दोन्ही दिवस सरासरी ९०.४ डेसिबलची नोंद झाली. मानाच्या गणेश मंडळांसह अनेक मंडळांनीही पांरपारिक वाद्यांना प्राधान्य दिले. ढोल-ताशे आणि झांज पथके यांच्या एकत्रित आवर्तनाने आवाज उंचावला होता. विशेषत: रात्री बारा वाजता ध्वनीपातळी अधिक नोंदविली गेली. पारंपरिक वाद्यांमुळे आवाज तितकाच असला तरी डीजेमुळे होणारा थरा आणि जाणविणारी धडधड मात्र कमी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासही कमी झाला. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश पवार, सतीश सुखबोटलावार, सुदेश राठोड, पंकज घोगरे, तुषार राठोड, आकाश रघतवान, वैभव नरवाडे, केतन साखरे, तुषार वाघीरे, विशाल भास्करे, सुदर्शन बध्दमवाड, जगन मोकमोड, प्रदीप तिडके, अनिकेत गजभिये, स्वप्नील धुलेवार, ओंकार कामाजी, मुरली कुंभारकर व प्रवीण शिवपुजे या विद्यार्थ्यांनी ही निरीक्षणे नोंदविली.  --------------------डीजे बंदीमुळे यंदा ध्वनीप्रदुषणाबाबत उत्सुकता होती. ध्वनीपातळी कमी असेल अशी अपेक्षा होती. पण जवळपास तेवढीच पातळी नोंदविली गेली. पण केवळ ढोल-ताशा असल्याने आवाजाची पातळी कमी-अधिक होती. डीजेचा थरार मात्र कमी झाल्याने दिलासा मिळाला.- डॉ. महेश शिंदीकर, समन्वयक-------------ध्वनीपातळी शंभरीच्या पुढेलक्ष्मी रस्त्यावर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत काही चौकांमध्ये ध्वनीपातळी शंभर डेसिबलच्या पुढे गेल्याचे आढळून आले. दुपारी १२ वाजता लिंबराज महाराज चौकात सर्वाधिक ११४.३ डेसिबलची नोंद झाली. दुपारी ४ वाजता याच चौकासह कुंटे चौक व शेडगे विठोबा चौकात अनुक्रमे १०५, १०३.१ व १००.४ डेसिबलची नोंद झाली. विशेष म्हणजे या वेळेत सर्व ढोल-ताशा पथके मार्गावर होती. त्यामुळे त्यांचा आवाजही काहीवेळा तीव्र झाल्याचे जाणवले. मागील वर्षी ध्वनीपातळी सरासरी ९०.९ डेसिबलपर्यंत नोंदविली गेली होती. यंदा त्यामध्ये किंचित घट झाली.

 

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनpollutionप्रदूषण