शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दौंड रेल्वेस्थानकात अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 23:06 IST

फलाट व परिसर स्वच्छ; विविध समस्या लवकरच सोडविणार

दौंड : दौंड रेल्वेस्थानकातून मोठ्या प्रमाणात गाड्यांचे आवागमन सुरू असते. परिणामी स्थानकाच्या अस्वच्छतेची मोठी समस्या निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर तीन अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून स्थानकाची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती स्टेशन व्यवस्थापक सेमुएल किल्फटन यांनी दिली.दौंड रेल्वे स्थानकातून दैनंदिन ११ हजार, तर महिन्याभरात साधारणत: अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची वर्दळ पाहता रेल्वेस्थानक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असते. परिणामी प्रवाशांचे तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला हानीकारक परिस्थिती निर्माण होते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून संबंधित नवीन यंत्रे आणण्यात आली आहेत.अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्रीने सर्व फलाट आणि परिसर स्वच्छ केला जात आहे. दौंड रेल्वे स्थानकातून दररोज ८० रेल्वे गाड्या धावतात; पैकी ५० गाड्यांना रेल्वे स्थानकामध्ये ५ मिनीट थांबा आहे, तर ३० रेल्वे गाड्यांना २० मिनिटांचा थांबा आहे. एकंदरीत दौंड रेल्वे स्थानकाची मोठी व्याप्ती पाहता हे रेल्वे स्थानक स्वच्छ राहावे म्हणून प्रयत्न केले जात असल्याचे किल्फटन यांनी स्पष्ट केले.स्थानकाच्या स्वच्छतेसाठी ४० कामगार सकाळी आणि २० कामगार रात्रीच्या वेळेत काम करतात.तीन सुपरवायझर देखरेखीसाठी आहेत.रेल्वे स्थानकातील विश्रांतीगृहात महिला प्रवासीवर्गासाठी स्वतंत्र स्तनपान विभाग सुरू केला आहे.रेल्वे महिला कर्मचाºयांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र रूम कार्यरत झाली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPuneपुणे