शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन! सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 10:32 IST

पुण्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न

पुणे: सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. शिवाजीनगर-गोखलेनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या निखिल धोत्रे नावाच्या तरुणानं रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. राहत्या घरी पत्नीच्या ओढणीनं गळफास लावून निखिलनं जीवनयात्रा संपवली. वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. निखिलनं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सासरच्या जाचाचा आणि कर्जबाजारीपणाचा उल्लेख आहे.

पुण्यातल्या शिवाजीनगर-गोखलेनगर परिसरात भागात असलेल्या सुगम चाळीत वास्तव्यास असलेल्या निखिल धोत्रेनं काल आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानं मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीदेखील जवळच सापडली. सासरच्यांकडून होणारा त्रास आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुसाईड नोटमधून करण्यात आली आहे.

निखिलचा आईसाठी संदेशनिखिल धोत्रेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईसाठी भावनिक संदेश आहे. 'आई तू काळजी करु नकोस. मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ. त्याची काळजी घे,' असं निखिलनं चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.