शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शुक्राच्या चांदणीवर राहते कोणीतरी? फॉस्फीन वायू आढळल्याने सुरू झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:17 IST

संशोधनविषयक ‘नेचर’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू आढळल्याचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

पुणे : शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू आढळल्याने येथे जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या समूहाने नुकताच केला आहे. त्यामुळे ‘परग्रहावरील जीवसृष्टी’ हा मानवी कुतूहलाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, शुक्र ग्रहावरील तप्त आणि रसायनयुक्त वातावरणात कोणते सजीव जिवंत राहू शकतात, फॉस्फीन वायू कोणत्या कारणामुळे शुक्रावर आला याचा सखोल अभ्यास व्हायला हवा, असे मत खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.संशोधनविषयक ‘नेचर’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू आढळल्याचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. शुक्रावरील सूक्ष्म जीवजंतूंनीच हा वायू वातावरणात सोडला असावा, असा दावा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या समूहाने केला आहे. या संशोधनामुळे शुक्रावर जीवसृष्टी असल्याच्या चर्चेला तोंड फुटले.शुक्र ग्रहापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील वातावरणात फॉस्फीन वायू आढळून आला आहे. हा वायू सूक्ष्म जीवांकडून सोडला जातो किंवा त्याची निर्मितीसुद्धा करता येऊ शकते. शुक्र ग्रहावर हा वायू कोणत्या कारणाने आढळला असावा, याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.ही बाब असामान्यचशुक्राचे तापमान अधिक असल्याने जीवसृष्टीसाठी ते योग्य नाही. परंतु, शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू सापडणे ही निश्चितच वेगळी गोष्ट आहे. या वायूची निर्मिती आणखी कोणत्या कारणामुळे होऊ शकते, याचाही शोध घ्यावा लागणार आहे. तसेच हा वायू जीवसृष्टीमुळेच शुक्राच्या वातावरणात आला आहे का, याचा सखोल अभ्यास करावा लागेल. - डॉ. सोमक रायचौधरी, संचालक, आयुका, पुणेकाही कोटी वर्षांनी...?आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार शुक्रावर जीवसृष्टी असू शकते. परंतु, ती कोणत्या प्रकारची असेल हे सांगता येत नाही. कारण शुक्राचे वातावरण हानिकारक आहे. काही कोटी वर्षांनंतर शुक्रावर जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का, किंवा काही कोटी वर्षांपूर्वी शुक्रावर असणारी जीवसृष्टी नष्ट झाली का, हा अभ्यासाचा विषय ठरू शकतो.- डॉ. यशवंत गुप्ता, संचालक, एनसीआरए, पुणे

टॅग्स :Puneपुणे