शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डेंसारखे क्रिकेटचे ऋण फेडण्यास काही जन्म लागतील : गावस्करांची कृतज्ञ भावना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 21:41 IST

माझ्या सारख्याला एका आयुष्यात खेळाला परत काही देणे शक्य होणार नाही. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. 

ठळक मुद्दे चंदू बोर्डे यांच्या ‘चंदू बोर्डे पँथर पेस’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तब्बल साठ वर्षे सेवा करुन बोर्डे यांनी क्रिकेटला दिले भरभरुन

पुणे : क्रिकेटपटू, व्यवस्थापक, निवडसमिती, प्रशिक्षक अशा विविध भूमिका ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी बजावल्या आहेत. तब्बल साठ वर्षे सेवा करुन त्यांनी क्रिकेटला भरभरुन दिले आहे. अशा पद्धतीने क्रिकेटचे ऋण फेडण्यासाठी माझ्या सारख्याला काही जन्म लागतील अशी कृतज्ञ भावना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. अनुबंध प्रकाशनाच्या ‘चंदू बोर्डे पँथर पेस’ या आत्मचरित्राचे प्रकाशन गावस्कर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. बोर्डे यांनी कॅम्प येथील पूना क्लबच्या मैदानावरुन वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याच मैदानावर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. निवृत्त कर्नल ललित राय, पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले-पाटील, अनुबंध प्रकाशनाचे अनिल कुलकर्णी, पुस्तकाचे अनुवादक मोहन सिन्हा यावेळी उपस्थित होते. गावस्कर म्हणाले, अगदी १९५८ पासून मी चंदू बोर्डे यांचा खेळ पाहत आहे. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीची एक शैली होती. ती जवळून पाहता आली. त्यांच्यासह त्या काळातील दिग्गजांकडूनच आम्ही भरपूर शिकलो. त्यांच्या वारशावर आमची पिढीही शिकत गेली. बोर्डे यांनी क्रिकेटची सेवा करत खेळालाही भरभरुन परत दिले. त्यांनी क्रिकेटसाठी साठ वर्षे वेचली आहेत. माझ्या सारख्याला एका आयुष्यात खेळाला परत काही देणे शक्य होणार नाही. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. माझ्या क्रिकेटची सुरुवात याच मैदानावर झाली. आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम देखील याच मैदानावर होत असल्याने कृतज्ञतेची भावना बोर्डे यांनी व्यक्त केली. त्या वेळचे पूना क्लबचे अध्यक्ष नगरवाला यांनी खेळण्याची प्रेरणा दिल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. आमच्या काळी प्रशिक्षक हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता. त्यामुळे आम्ही दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहूनच शिकल्याचेही त्यांनी सांगितले. क्रिकेटचे स्तंभ लेखक सुनंदन लेले यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेSunil Gavaskarसुनील गावसकर