शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या इमारती झळकणार सौरउर्जेने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 20:31 IST

महापालिकेचा विजेचा खर्च प्रचंड वाढला आहे. अपारंपरिक विजेचे स्रोत निर्माण करण्याकडे त्यामुळे लक्ष दिले जात आहे. त्यातूनच महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे.

ठळक मुद्देनिविदा मंजूर: ३४ इमारतींवर साकारणार प्रकल्पदेखभाल दुरूस्तीची सुरूवातीला अट १० वर्षे ती आता ५ वर्षे किमान मुख्य इमारतींमधील दिवे या विजेवर चालावेत असे अपेक्षित महापालिकेच्या मालकीच्या अन्य इमारतींमध्येही हा प्रकल्प

पुणे : महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०१६ मध्ये जाहीर करण्यात आलेली निविदा प्रक्रिया तब्बल २ वर्षांनी म्हणजे सन २०१८ मध्ये अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या विलंबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सुरूवातीला महापालिकेच्या मुख्य इमारतीवर हा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्यासाठीची ही निविदा आहे. यात मुख्य इमारतीच्या टेरेसवर ८२५ किलो वॅट क्षमतेची कनेक्टेड रुफ टॉप सोले पी. व्ही सिस्टिम उभारण्यात येणार आहे. जुलै २०१६ मध्ये ही निविदा मागवण्यात आली होती. त्याला मुदतीत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ५ कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यातील ३ कंपन्या सुरूवातीलात अपात्र ठरल्या. जुलै २०१७ मध्ये उर्वरित निविदा खुल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता थेट आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रशासनाने या निविदांमधून ४ कोटी ९५ लाख रूपयांची सर्वाधिक कमी किमतीची निविदा मान्यतेसाठी म्हणून स्थायी समितीकडे दिली आहे.    महापालिकेचा विजेचा खर्च प्रचंड वाढला आहे. अपारंपरिक विजेचे स्रोत निर्माण करण्याकडे त्यामुळे लक्ष दिले जात आहे. त्यातूनच महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे. मुख्य इमारतीपासून याला सुरूवात करण्यात येईल. किमान मुख्य इमारतींमधील दिवे या विजेवर चालावेत असे अपेक्षित आहे. .................सुरूवातीला यात १० वर्षे देखभालदुरूस्तीची अट होती. ती आता ५ वर्षे करण्यात आली आहे. तरतुद नसल्यामुळे निविदा प्रक्रियेस विलंब झाला. आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर अल्पावधीतच काम सुरू होईल. त्यानंतर महापालिकेच्या मालकीच्या अन्य इमारतींमध्येही हा प्रकल्प राबवण्यात येईल.श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्यूत 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmahavitaranमहावितरण