शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेच्या वापरातून दरमहा पुणे महापालिकेचे वाचताहेत १५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:33 IST

महापालिकेच्या इमारती : एक वषार्पुर्वी केली प्रकल्पाला सुरुवात 

ठळक मुद्देसोलर सिस्टीममधून दरमहा साडे चौदा हजार युनिट वीज निर्मिती पुणे महापालिकेने २९ इमारतींवर सौर प्रकल्प बसविले आहेत..

पुणे : विजेच्या उत्पादनावर असलेल्या मर्यादा आणि विजेचे न परवडणारे दर यामुळे शासकीय पातळीवर सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. शासकीय इमारतींवर सोलर सिस्टीम बसविण्यासोबतच नागरिकांनाही वारंवार आवाहन करण्यात येत आहे. पुणे महापालिकेने २९ इमारतींवर सौर प्रकल्प बसविले आहेत. यामधून महिन्याला निर्माण होणाºया विजेचा वापर संबंधित कार्यालयांमध्ये केला जात आहे. याचा पालिकेला फायदा झाला असून दरमहा तब्बल १५ लाख रुपयांची बचत होत असल्याचे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.  केंद्र व राज्य शासनाच्या निदेर्शांनुसार शासकीय इमारतींवर सौर प्रकल्प बसविण्यात येत आहेत. महापालिकेच्या विद्यूत विभागाकडून रेस्को आणि कॅपेक्स या दोन मॉडेलखाली सोलर सिस्टीम बसविण्यात आल्या आहेत. रेस्को मॉडेलच्या नऊ तर कॅपेक्स मॉडेलच्या वीस इमारतींवर हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. एकूण 36 इमारतींवर हे प्रकल्प प्रस्तावित असून अन्य ठिकाणांवरील कामे काही कारणास्तव पुढे सरकू शकलेली नाहीत. महावितरणकडून या प्रकल्पासाठी नेट मिटरींगही करुन घेण्यात येते. काही ठिकाणी ही कामेही पूर्ण झालेली नाहीत. बालगंधर्व रंगमंदिर, डॉ. नायडू रुग्णालय, घोले रस्ता कला दालन, कमला नेहरु रुग्णालय आदी इमारतींवर बसविलेल्या या सोलर सिस्टीममधून दरमहा साडे चौदा हजार युनिट वीज निर्मिती होत आहे. सौर ऊजेर्तून निर्माण होणारी वीज वापरल्याने महावितरणकडील विजेचा वापर कमी झाला आहे. एरवी महापालिका महावितरणला प्रति युनिटमागे देत असलेल्या रकमेपेक्षा निम्म्याने कमी पैसे सोलर सिस्टीम बसविलेल्या संस्थेला देत आहे. त्यामुळे पालिकेच्या पैशांची बचत होत आहे. यासोबतच शासकीय सुट्यांच्या दिवशी कार्यालय बंद असतात. त्यामुळे निर्माण होणारी वीज महावितरणला दिली जाते. महावितरणला जेवढे युनिट वीज दिली जाते त्याचे पैसेही बिलामधून वजा केले जातात. त्यामुळे पालिकेला त्याचाही फायदा मिळत आहे. मागील वर्षभरापासून हे प्रकल्प पालिकेच्या इमारतींवर सुरु करण्यात आलेले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmahavitaranमहावितरण