शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तू बोलशील, वाचा फोडशील, तेव्हाच समाज बदलेल...!

By admin | Updated: April 4, 2016 01:19 IST

पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात

पुणे : पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नसल्याचे वास्तव समोर आले. याबाबतचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांच्या लढ्याला बळ मिळाले. महिलांनी बोलले पाहिजे, वाचा फोडली पाहिजे, तेव्हाच समाज बदलेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच ‘लोकमत’ने केलेली पाहणी कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी सांगितले. स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांमध्येही जागरुकता निर्माण झाली असून, मूलभूत हक्क-अधिकाराची यानिमित्ताने जाणीवजागृती झाल्याची प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त केली. माजी जिल्हा सरकारी वकील व या प्रकरणातील एक याचिकाकर्त्या अ‍ॅड. निलीमा वर्तक यांनी सांगितले की, महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत आहे़ महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे या सर्व चुकीच्या गोष्टी असून याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार करणार आहे. नाथपंथी असलेल्या एका मंदिरात महिलांना खुला प्रवेश दिला जातो आणि एका ठिकाणी नाही, हा भेदभाव आहे़ देवळांना हा नियम लागू आहे, आम्हाला नाही, असे त्यात म्हटले आहे़ ते बरोबर नाही़ न्यायालयाने आपल्या निर्णयात देवळे व सार्वजनिक प्रार्थनास्थळे असे म्हटले आहे़ ज्या मंदिरांचे सार्वजनिक ट्रस्ट आहेत़ त्यांनाही हा निर्णय लागू आहे़ ओंकारेश्वर मंदिर हे खूप जुने आहे़ त्याचा जुना तपशील पाहिला तर महिला नक्कीच तेथे पूजा करीत असतील, असे वाटते़ ‘‘न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर लगेचच त्याबद्दल समाजमनाची मानसिकता तपासण्याचा लोकमतचा स्टिंग आॅपरेशनचा उपक्रम अभिनास्पद वाटला. महिलांनाही समान हक्क-अधिकार आहेत. असे असताना काही ठिकाणी मात्र महिलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यापैकीच शनिशिंगणापूर असेल, अथवा त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी आम्ही प्रातिनिधीक स्वरुपात हक्कासाठी लढाई लढत आहोत. लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून हाच विचार समाजासमोर मांडला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश खुला असला पाहिजे. खरं तर आधीच याबाबतचा निर्णय झालेला आहे. महिलांना प्रवेश बंदी केल्यास अथवा मंदिर प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास सहा महिन्यांचा कारावास अथवा दंडाची शिक्षा आहे,’’ असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रतिमा परदेशी म्हणाल्या, जात आणि धर्मव्यवस्थेच्या प्रभावामुळे तसेच पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क-अधिकार वापरता आले नाहीत. महिलांना आजच्या काळातही मंदिरात खुला प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रबोधनाबरोबरच महिलांना त्यांच्या हक्क-अधिकाराची जाणीव करून देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.‘‘शोषीत जनतेला नेहमीच न्याय हक्कासाठी लढाई करावी लागलेली आहे. कायद्याने सर्वांना समान अधिकार असला, तरी तो मिळविण्यासाठीही जनतेला लढाई करावी लागते, ही खेदाची बाब आहे. समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार सर्वांनी मान्य करायला हवा. जात आणि धर्म व्यवस्थेत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले. जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महिलांना दुय्यम वागणूक देण्यात आली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शाळा सुरू केली. त्या फुल्यांच्या पुण्यात महिलांना मंदिर प्रवेश नसणे ही शोकांतिका म्हणावी लागेल. ‘लोकमत‘ने समाजासमोर वास्तव आणल्याने आता तरी महिला स्वत:हून पुढे येतील, अशी आशा वाटते,’’ असे सत्यशोधक जनआंदोलन संघटनेचे किशोर जाधव यांनी सांगितले.