शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने उदारमतवाद, विचारस्वातंत्र्य स्वीकारावे : नरेंद्र चपळगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:07 IST

जागतिक पातळीवरच असहिष्णुतेचे वातावरण असल्याने आज विचारस्वातंत्र्याचे महत्व सांगावे लागत आहे.

ठळक मुद्देपहिला श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान प्रदान समारंभ माणसाचे अस्तिवच विचार करण्याच्या शक्तीवर एक हजार वर्षाचा काळ उदारमतवादाचा व विचारस्वातंत्र्याचा

पुणे : अनेक समाजसुधारकांना समाजातील रुढी-परंपरा बदलताना अडचणी आल्या. कारण ते अल्पमतात तर असहिष्णु लोकांचे बहुमत होते. विरोधकांनी मांडलेल्या मुद्याला आपण किती संयमाने आणि कोणती भाषा वापरून उत्तर देतो, यावर तुमच्यातील विचारस्वातंत्र्याची भावना ठरते. त्यामुळे विचारस्वातंत्र्य आणि उदारमतवादाचा समाजानेच स्वीकार केला तरच तो खरे स्वातंत्र उपभोगु शकेल, असे मत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी येथे व्यक्त केले.डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्र व राजहंस प्रकाशनच्या वतीने रविवारी चपळगावकर यांना पहिला श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे व राजहंस प्रकाशनचे संपादक सदानंद बोरसे व्यासपीठावर उपस्थित होते. चपळगावकर यांनी ‘स्वातंत्र्य : लेखकांचे आणि वाचकांचे’ या विषयावर विचार व्यक्त केले. ते म्हणाले, जागतिक पातळीवरच असहिष्णुतेचे वातावरण असल्याने आज विचारस्वातंत्र्याचे महत्व सांगावे लागत आहे. माणसाचे अस्तिवच विचार करण्याच्या शक्तीवर आहे. एक हजार वर्षाचा काळ उदारमतवादाचा व विचारस्वातंत्र्याचा आहे. हेकेखोरपणा हा सत्तेचा दुर्गण आहे. त्यामुळे सल्ला देणारे विचारवंत समाजात असावे लागतात. ज्ञानाचे शत्रु असणारे जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा काय होते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. हिंसेने किंवा कायद्याचा गैरवापर करून अधिकार काढू घेतले जातात. असे प्रकार पढे होणार नाही, याची खात्री देता येत नाही.लोकांच्या झुंडशाहीचा विरोध लेखकांना एकट्याला करावा लागतो. साहित्य संस्था त्यांच्या पाठिशी उभ्या राहत नाहीत. त्यामुळे अनेकदा लेखकाच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होते. त्यावर मात करून जो लेखक लिहितो तो निर्माणशील दृष्टीचे स्वातंत्र टिकवितो. वाड्मय कधीही एका जातीचे, पंथाचे, पक्षाचे नसते. जेवढी बंधने सत्ता घालते त्यापेक्षा जास्त बंधने लेखक स्वत:वर घालतात. लेखकाची सतत भलावण करणारे मित्र हे त्याचे शत्रु असतात. त्यामुळे लेखांनी स्तुतीपासून दुर राहायला हवे.  लेखक हा त्या काळाचा साक्षीदार असतो. त्यामुळे त्याने नेहमी खरे लिखाण करायला हवे. वाचकांचा व लेखकांचा अधिकार समांतर असायला हवा. त्यामुळे वाचकांचे स्वातंत्र्यही टिकवायला हवे. वाचनातून निर्माण होणारे विचारस्वातंत्र्य तरूण पिढी विसरत चालली आहे, असे चपळगावकर यांनी नमुद केले. ......दीर्घ वैचारिक वाड्मयाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात विचारवंतांची वानवा आहे. समाज अनुदार बनतोय. सर्व भ्रष्ट होत चालले आहे. सांस्कृतिक मुल्याच्यादृष्टीने गढूळ, निम्नस्तरीय वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या राजकीय व सामाजिक स्थितीचा विचार केला तर आज विचारवंतांची खुप गरज आहे. संकुचितपणा थोपवायचा असेल तर लोकांपर्यंत समाजातील आदर्श पोहचवायला हवेत.- डॉ. सुधीर रसाळ

टॅग्स :Puneपुणे