शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक जाणिवेने भारलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ‘भाई ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:39 IST

संवेदनशील लेखकाबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणून पुलंची वेगळी ओळख होती. त्यात त्यांना सुनीताबाईंची देखील महत्वपूर्ण साथ मिळाली..

ठळक मुद्देपुलोत्सवात गुरुवारी झालेल्या 'पुलंचे सामाजिक भान' या विषयावर परिसंवाद

पुणे : केवळ लेखनातून नव्हे तर प्रत्यक्षात समाजात फिरुन तळागाळातील पीडितांच्या चेह-यावर आनंद फुलविण्याचे काम पुलंनी केले. त्याकरिता सामाजिक भावनेतून मोठ्या स्वरुपात त्यांनी मदत केली. अनेक संस्थांना देणग्या देवून त्यांचे कार्य अखंडित सुरु राहावे यासाठी प्रयत्नशील राहिले. संवेदनशील लेखकाबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणून पुलंची वेगळी ओळख होती. त्यात त्यांना सुनीताबाईंची देखील महत्वपूर्ण साथ मिळाली, अशा शब्दांत विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांनी ’’भाईं’’च्या सामाजिक व्यक्तिमत्वाचे पैलु उलगडले.  पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि स्क्वेअर १च्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवात गुरुवारी झालेल्या 'पुलंचे सामाजिक भान' या विषयावरील परिसंवादाचे. या परिसंवादात डॉ. अनिल अवचट, गिरीश प्रभुणे आणि रेणू गावस्कर सहभागी झाले होते. सूत्रसंचालनाच्या माध्यमातून डॉ. मंदार परांजपे यांनी आमटे कुटुंबियांचे प्रतिनिधी या नात्याने पुलंविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. परिसंवादापूर्वी बालगंधर्व कलादालनात दाखविण्यात आलेल्या फिल्म डिव्हीजन्स निर्मित 'पु.लं' या लघुपटाचा रसिकांनी आस्वाद घेतला.   गावस्कर म्हणाल्या, सुनीताबाईंना एकदा एका खेड्यातून एका मुलाचे पत्र आले. 'आम्हाला शाळेतून काढून टाकतात, शेतात पाठवतात, कारखान्यावर पाठवतात', असे त्या मुलाने लिहिले होते. तेव्हापासून पन्नास पैशांची शाळा आणि शंभर रूपयांची शाळा अशी दरी पुलं आणि सुनीताबाईंना अस्वस्थ करून गेली. त्यामुळेच या दांपत्याची वेदना कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे सतत वाटत रहाते. आपल्याला बरेच  काही करता आले पण जे करता आले नाही, त्यात लहान मुलांना गाणे शिकवता आले नाही, अशी खंत पुलंना वाटत होती. प्रभुणे म्हणाले, पुलंना भेटण्याची मला प्रचंड ओढ होती. ते पुण्यात आल्यानंतर बरेचदा मी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. पण पुलंच्या लेखनात व्यत्यय नको, म्हणून कर्तव्यदक्ष सुनीताबाईंनी मला परत पाठवले. त्यानंतर माजगावकरांच्या माणूसचा एक विशेषांक मी काढला होता आणि त्यात 70-80 पानांचा एक लेख लिहिला होता. तेव्हा पुलंनी स्वत:हून माझी माहिती काढून मला घरी भेटायला बोलवले होते.* पुलंची ओळख ही एका तीव्र मतभेदातून झाल्याची आठवण डॉ. अवचट यांनी सांगितले. ते म्हणाले,  बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवरील झोपडपट्टया हटवून त्याठिकाणी रंगंमदिर उभारले पाहिजे, यासाठी पुलं आग्रही होते. त्यांच्या या भूमिकेला माझा विरोध होता. त्याविषयी साधना साप्ताहिकात दीर्घ लेख देखील लिहिला होता. पण कालांतराने आमच्यातील मतभेद दूर झाले आणि पुलं माझे आईबाप बनले. मतभेदाच्या काळातील कटूता कणभरही मनात न ठेवता त्यांनी आपलेसे केले. पुलं आणि सुनीताबाई प्रचंड हळवे होते.  मुक्तांगणचा जन्म त्यांच्याच प्रेरणेने झाला. 

टॅग्स :PuneपुणेP L Deshpandeपु. ल. देशपांडे