शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

समाजमन बदलण्याची ताकद सनदी सेवेत : चंद्रकांत दळवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:12 IST

आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा.

ठळक मुद्देविचारांची बैठक पक्की असेल तर आपला विचार आपण शांतपणे देखील मांडू शकतो.

पुणे : तळागाळातील विशेष घटकांचा विकास व्हावा याकरिता मोठ्या प्रमाणावर दातृत्वाची गरज निर्माण झाली आहे. दुस-या बाजूला भवतालची सामाजिक परिस्थिती बदलण्याची ताकद ही सनदी सेवेत आहे, असे मत निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. महात्मा फुले वसतिगृह या संस्थेतर्फे निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचा सत्कार ज्येष्ठ विधीज्ञ अँड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. सुरेश गुजराथी, अ‍ॅड. संदिप गुजराथी यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीकृष्ण पाषाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या पवन साळुंखे आणि मैथली कोरडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. दळवी म्हणाले की, उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय मिळावा याकरिता समाजातील दातृत्वान व्यक्तींनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच समाजातील जी परिस्थिती बदलता येत नाही ते बदलण्याची ताकद सनदी सेवेच्या माध्यमातून मिळते. त्याचा नवोदित अधिका-यांनी सदुपयोग क रावा. प्रशासकीय सेवांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे मोठे दालन खुले होत असते. आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा. आव्हाड म्हणाले, वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करता येते. वकिली व्यवसाय हा भावनिक आणि व्यवहारिक गुंतागुंत सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु विचारांची बैठक पक्की असेल तर आपला विचार आपण शांतपणे देखील मांडू शकतो. ओरडून किंवा मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपले म्हणणे खरे ठरत नसते. त्यामुळे वकिलांनी संयम आणि संयत भुमिका ठेवावी. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकृष्ण पाषाणकर, सुरेश गुजराथी आणि संदीप गुजराथी, महात्मा फुले वसतिगृहाचे मुख्य विश्वस्त उल्हास ढोले-पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केली. अरुण कुदळे यांनी  प्रास्ताविक केले. दिपक जगताप यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेChandrakant Dalviचंद्रकांत दळवी