शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

...म्हणून, या निजामाच्या अवलादी इथं वळवळ करायला लागल्या; राज यांनी शिवसेनेवरच फोडलं खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 15:00 IST

Raj Thackeray In Pune : या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन दिली कुणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत. यांचा (शिवसेनेचा) तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. 

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ, मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आज पुण्यातही धडाडली.  यावेळी राज यांनी शिवसेनेसह विरोधकांवर तुफान हल्ला चढवला. "यांच्या राजकारणात. या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन दिली कुणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत," असे म्हणत, राज ठाकरे यांनी एमआयएमच्या वाढत्या प्रभावाचे खापर शिवसेनेवर फोडले आहे. ते पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचच्या सभागृहात बोलत होते.

राज म्हणाले, यांच्या-यांच्या राजकारणासाठी आणि हिंदू-मुस्लीम मतांच्या धृविकरणासाठी, त्या एमआयएमला मोठे केले. एमआयएम संभाजीनगरमध्ये हिंदूंच्या विरोधात सातत्याने बोलत राहिली पाहिजे, म्हणजे यांची रोजी-रोटी चालू राहील. यांच्या लक्षात आले नाही, की आपण एक राक्षस वाढवतोय आणि म्हणता म्हणता तिकडे एमआयएमचा खासदार झाला. यांच्या राजकारणात. या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन दिली कुणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत. यांचा (शिवसेनेचा) तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. 

आमच्याच देशात आणि आमच्याच महाराष्ट्रात ही एमआयएमची आवलाद येते आणि जो आमच्या शिव छत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला, त्या औरंगजेबाच्या कबरीवर येऊन डोकं टेकवतात आणि आम्हाला लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही आम्हाला, कारण सत्ताधारीच असेल बसलेले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असले, तर यापलिकडे काय बोलायचं? सुफी संतं? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी केला.

अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणेत. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता म्हणे. मग काय मधे शिवाजी महाराज आले. तुमच्या सोईसाठी कशाला इतिहास बदलताय? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी केला. 

हेही वाचा - 

'यांचं' राजकारण एकदा मोडीतच काढा! औरंगाबादच्या नामांतरासह राज यांच्या PM मोदींकडे 3 मोठ्या मागण्या

उद्धव ठाकरे तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा सवाल

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMNSमनसे