शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंमली पदार्थ तस्करी करणारी टोळी पुण्यात जेरबंद; हेरॉईन-चरससह साडेबारा लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:27 IST

सतत ठावठिकाणा बदलत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अंमली पदार्थांच्या ७ तस्करांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एकूण १०२ ग्रॅम हेरॉईन आणि दोन किलो ५० ग्रॅम चरससह १२ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. 

ठळक मुद्देपोलिसांनी सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात, सर्व आरोपी सराईत गुन्हेगारमुख्य आरोपी आरती मिसाळने अंमलीपदार्थ व्यावसायातून अनेक ठिकाणी विकत घेतल्या सदनिका

पुणे : सतत ठावठिकाणा बदलत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अंमली पदार्थांच्या ७ तस्करांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एकूण १०२ ग्रॅम हेरॉईन आणि दोन किलो ५० ग्रॅम चरससह १२ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. आरती महादेव मिसाळ (रा. लोहियानगर), पुजा महादेव मिसाळ (रा. इनामके चाळ, लोहियानगर), निलोफर हयात शेख (रा. हरकारनगर), रॉकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (रा. रामटेकडी हडपसर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कारसह रोख रक्कम, मोबाईल फोन, ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐवज हस्तगत करण्यात आला. पोलीस तपासात त्यांच्याकडे हेरॉईन (ब्राऊन शुगर) आणि चरसचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून शंभर ग्रॅम हेरॉईन व २ किलो ५० ग्रॅम चरसचा साठा हस्तगत केला. असे ६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे आणि त्यांच्या पथकाने १५ डिसेंबर रोजी घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीतून छापा मारला होता. त्यात संशयीत आरोपी गोपीनाथ नवनाथ मिसाळ (वय २२, इनामके मळा लोहियानगर), हुसैन पापा शेख (वय २८, रा. सय्यद अली चाळ, सांताक्रूझ, मुंबई) यांना पकडले होते. त्यांच्याकडून ६७ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आोरपी आरती मिसाळ व त्यांचे साथीदार पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते. खडक पोलिसांना एका गुन्ह्याचा तपास करीत असताना या टोळीतील संशयीत अजहर उर्फ चुहा हयात शेख (रा. हरकारनगर) याला १८ डिसेंबरला ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी आरती मिसाळ ही काळ्या रंगाच्या मोटारीतून नगररस्ता वाघोली परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सागर केकान व विशाल शिंदे यांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. 

अंमली पदार्थातून खरेदी केल्या सदनिकामुख्य आरोपी आरती मिसाळ हिने अंमलीपदार्थाच्या व्यावसायातून अनेक ठिकाणी सदनिका विकत घेतल्या असून, अनेक वाहने देखील खरेदी  केली आहे. आरोपींच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेली रक्कम आणि सोने देखील या व्यावसायातून खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे