शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधा-यांकडूनच स्मार्ट सिटीचे वाभाडे, पालकमंत्र्यांचीही टीका,अधिका-यांवर कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 03:24 IST

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने मोठ्या दिमाखात विविध कामांचे उद््घाटन ठेवले खरे, मात्र त्याच कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट स्थानिक आमदारांनीही केंद्र सरकारच्या या योजनेत प्रशासन नीट काम करीत नाही

पुणे: स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने मोठ्या दिमाखात विविध कामांचे उद््घाटन ठेवले खरे, मात्र त्याच कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट स्थानिक आमदारांनीही केंद्र सरकारच्या या योजनेत प्रशासन नीट काम करीत नाही, अशी टीका करीत त्यांचे वाभाडे काढले. कामाला भरपूर वाव आहे, पण कामे होत नाहीत. त्याला गती द्या, अन्यथा अधिकाºयांच्या खिशातून नागरिकांचे पैसे वसूल करावे लागतील.कंपनीने निवडलेल्या औंध-बाणेर-बालेवाडीमधील औंध येथील स्मार्ट सिटीमधील मॉडेल रस्ता म्हणून दीड किलोमीटरचा रस्ता तसेच प्लेस मेकिंग या योजनेचे उद््घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते बुधवारी सकाळी औंध येथे झाले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप या वेळी उपस्थित होते.आमदार काळे यांनी बोलताना सुरुवातीलाच प्रशासनाविषयीच्या नाराजीचा सूर लावला. ते म्हणाले, या योजनेत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही, ही अत्यंत चुकीची बाब आहे. त्यामुळे आता योजनांमध्ये त्रुटी निघू लागल्या आहेत. काम कोणासाठी करायचे आहे, कसे करायचे आहे याचा काहीही विचार होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी उपयुक्त सूचना करू शकतात, मात्र त्यांना कसली माहितीच दिली जात नाही.काळे यांचे बरोबर आहे, असे स्पष्ट करून बापट म्हणाले. पुणेकरांच्या स्मार्ट सिटीबद्दल अनेक अपेक्षा आहेत. त्या त्यांनी वेळोवेळी व्यक्तही केल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात दाखवावे, असे काहीही होताना दिसत नाही. शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार झाला. मेट्रो योजना मागून आली तरीही तिचे काम सुरूसुद्धा झाले. स्मार्ट सिटीमधील कामे मात्र दिसत नाहीत, असे चालणार नाही. उशीर करणाºयांना जबाबदार धरून नागरिकांचा पैसा त्यांच्याकडून वसूल केला जाईल, असे बापट म्हणाले.जबरदस्तीने कामे लादू नकास्मार्ट सिटीमधील कामे नागरिकांवर लादू नका, त्यांचा विचार घ्या, त्यांना काय हवे ते महत्त्वाचे आहे. नको असलेली कामे जबरदस्तीने लादली गेली तर ती कोणीही स्वीकारणार नाही, असे बापट यांनी अधिकाºयांना बजावले. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे