शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

स्मार्ट सिटीचे डिस्प्ले बेकायदा : महापालिकेने बजावली नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 19:23 IST

पुणे शहरात काम करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने बेकायदेशीर व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले लावल्याने पुणे महापालिकेने त्यांना नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिकेत नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

पुणे :  पुणे शहरात काम करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने बेकायदेशीर व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले लावल्याने पुणे महापालिकेने त्यांना नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिकेत नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. 

  शहरात महापालिकेच्या व्यतिरिक्त स्मार्ट सिटी कंपनीमार्फत काही प्रकल्प राबवले जातात. त्यामुळे शहराच्या विकासाचे काम महापालिकेसोबत स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातूनही होत असते. मात्र याच कंपनीने शहरात माहिती देणारे डिजिटल डिस्प्ले बसवले होते. या डिस्प्लेवर स्मार्ट सिटी विषयी विविध प्रकारची माहितीही देण्यात येत आहे. मात्र हे डिस्प्ले बसवण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीचे डिस्प्ले वादात सापडला आहे. 

     संपूर्ण शहरात सुमारे १६१ ठिकाणी हे डिस्प्ले बसवण्यात आले असून याविरोधात २४ ऑगस्ट २०१७रोजी स्मार्ट सिटीला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा याच विषयावर नोटीस पाठवण्यात आली. याबाबत सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सदस्य अविनाश बागवे यांनी प्रश्न उपस्थित केला.शहरात लावण्यात येणाऱ्या इतर फलकांवर महापालिका कारवाई करत असताना स्मार्ट सिटीच्या बेकायदेशीर फलकांना मान्यता का देण्यात आली असा सवाल सभासदांनी उपस्थित केला आहे.याच विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका