शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी मिशनची गती मंदावली, अवघा १३५ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 01:38 IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी मिशन’ कार्यक्रमांतर्गत शहरात २२५७ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साडेतीन वर्षांमध्ये जेमतेम १३५ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत.

पुणे  - केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी मिशन’ कार्यक्रमांतर्गत शहरात २२५७ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साडेतीन वर्षांमध्ये जेमतेम १३५ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. स्मार्ट सिटी मिशन स्पर्धेत द्वितीय स्थानी असलेल्या पुण्यामध्ये स्मार्ट सिटीच्या कामांची गती मात्र मंदावल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशभरातील १०० शहरांची स्पर्धा घेऊन निवड करण्यात आली. प्रथम वर्षी भुवनेश्वर पाठोपाठ पुणे द्वितीय क्रमांकाचे शहर ठरले होते. शहराला केंद्राकडून पहिल्या वर्षी २०० कोटी आणि नंतरच्या तीन वर्षांमध्ये प्रत्येकी १०० कोटी रुपये विशेष निधी देण्याची घोषणा झाली होती. राज्य शासन आणि महापालिकाही तेवढीच रक्कम देणार अशीही घोषणा करण्यात आलेली होती.पुणे शहरात पहिल्या टप्प्यात विविध प्रकारच्या ५२ प्रकल्पांची निवड करून त्याचे काम सुरू करण्यात आले. औंध-बाणेर-बालेवाडी या परिसराची निवड ‘एरिया डेव्हलपमेंट’अंतर्गत करण्यात आली. पहिल्याच वर्षी पुणे स्मार्ट सिटी कंपनीला १९५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, अडीच वर्षांमध्ये केवळ १३५ कोटी रुपयांचाच निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी जोपर्यंत खर्च होणार नाही, तोपर्यंत पुढील निधी देता येणार नसल्याचे स्मार्ट सिटीला केंद्र शासनाने कळविले आहे.पुणे स्मार्ट सिटी कंपनीने आतापर्यंत केवळ १८ प्रकल्पांसाठी केवळ ५३१ कोटी १५ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. तसेच, ४३१ कोटी ३५ लाख रुपयांच्या कामांच्या वर्क आॅर्डर दिल्या आहेत. तर या वर्क आॅर्डरपैकी आतापर्यंत केवळ १३५ कोटी रुपयेच खर्च झाल्याचे चित्र आहे.स्मार्ट सिटी कंपनीकडून औंधमध्ये दोन रस्ते आणि पदपथ, एरिया डेव्हलपमेंट अंतर्गत दोन उद्याने तयार करण्यात आली आहेत.पूर्ण शहरात शासकीय संदेश देणाऱ्या व्हिडीएमडी (डिजिटल बोर्ड) आणि सार्वजनिक ठिकाणी वाङमय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर योजनेसाठी यंत्रणाही उभारली जात आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीPuneपुणे