शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या गृहसंस्थांना निवडणुकीतून सूट मिळणार, दहा हजार सोसायट्यांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 07:25 IST

आकाराने लहान असलेल्या गृह संस्थांमधील पदाधिकाऱ्यांची निवड त्यांना सर्वसाधारण सभेतून करून घेण्यास मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.

पुणे : आकाराने लहान असलेल्या गृह संस्थांमधील पदाधिकाऱ्यांची निवड त्यांना सर्वसाधारण सभेतून करून घेण्यास मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सहकारी निवडणुक प्राधिकरणाच्या माध्यमातून निवडणूक कार्यक्रम घेण्यातून त्यांना सूट मिळणार आहे. शहरातील सुमारे दहा हजारांहून अधिक सोसायट्यांना त्याचा फायदा मिळेल.

सहकार कायद्यानुसार सर्व प्रकारच्या गृह संस्थांना मतदानाद्वारे पदाधिकारी निवडणे बंधनकारक होते. बिनविरोध निवडणूक असली, तरी निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा लागत होता. अगदी मतदार यादी तयार करण्यापासून, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे काम करावे लागत होते. हा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येतो. निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण खर्च संबंधित गृहनिर्माण संस्थांनाच करावा लागतो.राज्यात लहान आणि मध्यम स्वरुपाच्या अनेक संस्था आहेत. त्यातही दहा ते पंधरा सदस्य असलेल्या संस्थांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांना निवडणुकीचा खर्चही झेपत नाही. काही ठिकाणी आरक्षण असलेल्या जागा रिकाम्या राहतात. त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांचे काम ठप्प झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या.सहकार कायद्यातील त्रुटींवर उपाय सुचविण्यासाठी सहनिबंधक संदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने गृहसंस्थांच्या निवडणुकांबाबत केलेल्या शिफारशीनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या