शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

भोर शहराला गाळमिश्रित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

भोर : गेल्या दोन तीन दिवसांपासून शहराला गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. नगरपालिकेकडूनही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात ...

भोर : गेल्या दोन तीन दिवसांपासून शहराला गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. नगरपालिकेकडूनही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने साथीचे आजार परसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊनही शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी ९० एचपी व ५० एचपीच्या दोन मोटर तसेच एक डीआय पाईपलाईन, एक सिमेंट पाईपलाईन होती. पैकी सिमेंट पाईपलाईन खराब झाल्यामुळे सारखी फुटत असल्याने दररोज नियमित पाणी शहरातील नागरिकांना मिळत नव्हते. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांनी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नगरपालिकेला सुमारे १३.५० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र सदर योजनेचे काम संथ गतीने सुरु होते. त्यामुळे काम होण्यास उशिरा झाला होता. शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून ३.५ एमएलडीच्या जलशुध्दीकरण (फिल्टरचे) कामही पूर्ण झाले आहे. तर सुमारे २० लाख लिटर पाण्याच्या टाकीसाठी ७३ लाख रुपये निधी मंजूर असून कामही सुरु आहे.

मागील दोन महिन्यांपासून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र स्वच्छ आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसून गाळमिश्रित पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. संततधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे.

पाणी उकळून पिण्याचे आवाहन

भोर शहराला जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, धरणातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित असल्याने प्रक्रिया करूनही थोड्याफार प्रमाणात पाणी गढूळ येत असेल. येत्या तीन चार दिवसांत शुध्द पाणीपुरवठा सुरु होईल. तोपर्यंत नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा निर्मला आवारे व उपनगराध्यक्ष अमित सागळे यांनी केले आहे.

२१ भोर