शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण; जिल्हाधिकारी सौरभ राव यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:58 IST

दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी त्यांना रोजगार देणे आवश्यक असल्याने त्यासाठी त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संबंधीची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. 

ठळक मुद्देजिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा स्वयंरोजगार अधिकारी, पुणे महानगरपालिकेची घेतली जाणार मदतदिव्यांगांसाठी असलेल्या तीन टक्के आरक्षणामधून नोकर्‍या मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न

पुणे :  दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी त्यांना रोजगार देणे आवश्यक असल्याने त्यासाठी त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुणे महानगरपालिका, जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा स्वयंरोजगार अधिकार्‍यांच्या मदतीने कल चाचणीही घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून शासकीय योजनांपासून एकही दिव्यांग शिल्लक राहू नये यासाठी खबदारी घेण्यात येत आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या मतदार संघातील दिव्यांगांचा मेळावा घेण्यात येणार आहे. योजनांसाठी पात्र असलेल्या २ हजार ७०० दिव्यांगांची पडताळणी पूर्ण झाली असून यामध्ये आणखी दिड हजार दिव्यांगांची वाढ होणार असल्याचे राव यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिव्यांगांचे शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये दिव्यांगांच्या साहित्याच्या गरजांची निश्चिती केली जाणार आहे. त्यांना लागणार्‍या सायकल्स, कुबड्या आदी साहित्याची यादी करुन ती शासनाला पाठविली जाणार आहे. हे साहित्य तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीदरम्यान दिव्यांगांना कौशल्याधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा स्वयंरोजगार अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेची मदत घेतली जाणार आहे. चार हजार दिव्यांगांपैकी ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगांना रोजगार आणि स्वावलंबनाचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. १८ ते २५ वयोगटातील दिव्यांगांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून ७ वीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. एक ते सहा आठवड्यांचे कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर दिव्यांगांना केंद्रिय समाजकल्याण आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते साहित्य तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर दिव्यांगांचा रोजगार मेळावा घेतला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या मदतीने घेतल्या जाणार्‍या या मेळाव्याला एमआयडीसीतील कंपन्या, खासगी कंपन्या आणि आस्थापनांना आमंत्रित केले जाणार आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या तीन टक्के आरक्षणामधून नोकर्‍या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे