शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

Pune| नर्‍हेमध्ये मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधे सहा वाहनांना आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 12:09 IST

स्थानिकांनी बादली व नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला...

पुणे : काल (शुक्रवारी) मध्यराञी ०२:१८ वाजता नर्‍हेमधील हरिहरेश्वर पार्क, बी विंग, माताजी नगर, पुणे-४१ याठिकाणी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यावेळी तत्काळ नवले अग्निशमन केंद्राचे अग्निशमन वाहन रवाना झाले. घटनासथळी पोहोचताच इमारतीच्या पार्किंगमधे वाहनांना आग लागल्याचे पाहताच जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पूर्ण विझवत धोका दूर केला. तत्पुर्वी दलाची मदत पोहचण्याआधी स्थानिकांनी बादली व नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले.

अग्निशमन दलाकडून वेळोवेळी शहरात राबविण्यात येणारी अग्निशमन सुरक्षाविषयक प्रात्यक्षिक व संवाद यामुळे नागरिकांमधे आग व त्याच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आगीमधे ४ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तसेच पार्किंगच्या वरिल सिलिंगचा काही भागाला आगीची झळ लागल्याचे दिसून आले. सदर इमारत ही तळमजला अधिक सहा मजले अशी असून आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. 

या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश गोरे, वाहनचालक पांगारे तसेच जवान भरत गोगावले, शिंदे व मदतनीस द. नलवडे, प्र.नलवडे, वि. मछिंद्र यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfire brigade puneपुणे अग्निशामक दल